मुंबई

गेल्या २४ तासात पोलादपूर १२९मी मी पावसाची नोंद

CD

पोलादपूरला मुसळधार पावसाने झोडपले!
पोलादपूर, ता. २४ (बातमीदार) ः गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर पोलादपूर तालुक्यात दमदार हजेरी लावली आहे. मंगळवारी तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, या वर्षातील पावसाची पहिली शतकी सलामी मोजली गेली आहे. गेल्या २४ तासांत तालुक्यात १२९ मिमी पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत एकूण १६३ मिमी पाऊस पडल्याची माहिती पोलादपूर तहसील कार्यालयातून मिळाली आहे.
पावसाच्या दमदार हजेरीमुळे तालुक्यातील ढवली, कामथी, घोडवली, चोळई नद्याच्या पात्रातून पाणी वाहू लागले असून, सावित्री नदीच्या पात्रामध्ये वाढ झाली. तसेच, महामार्ग विभाग व नगरपंचायतच्या नालेसफाईचा बोजवारा उडाला असून, पोलादपूर नजीक महामार्गावर पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. पोलादपूरनजीक प्रभातनगरजवळ पाणी साचल्याने तातडीने जेसीबीच्या साह्यायने चर खोदत पाण्याला वाट मोकळी करून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

ओंकार भोजनेच्या गाजलेल्या स्कीटवर विद्या बालन फिदा; स्वतः बनवला रील, व्हिडिओ पाहून नेटकरी खुश

Latest Marathi News Live Update : यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

किरकोळ वाद आता चाकूहल्ल्यांपर्यंत... प्रवाशांमध्ये संताप का वाढतोय? मुंबई लोकलमधील वाढत्या आक्रमकतेचे विश्लेषण

Baramati News : बारामतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पांना गती देण्याचे सुनेत्रा पवार यांचे निर्देश....

SCROLL FOR NEXT