मुंबई

पावसात साचलेले पाणी घरात शिरण्याची शक्य

CD

पोलादपूर स्कायवॉकचे नियोजनशून्य काम
पहिल्याच पावसात वस्तीत साचले पाणी, घरात शिरण्याची भीती!
पोलादपूर, ता. २४ (बातमीदार) ः मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरनजीक नव्याने उभारण्यात येत असलेल्या पादचारी पूल अर्थात स्कायवॉकच्या कामाचा सावळा-गोंधळ पहिल्याच पावसात समोर आला आहे. योग्य नियोजनाअभावी या परिसरात गुडघाभर पाणी तुंबले असून, हे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या बेजबाबदार कारभारामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
महामार्ग रुंदीकरणाच्या वेळी योग्य नियोजन न केल्यामुळे अनेक ठिकाणी महामार्गाची उंची वस्तीपेक्षा जास्त झाली आहे. सखल भागातील साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी प्रशासनाने योग्य ती व्यवस्था केली नसून दरवर्षी पावसाळ्यात येथे पाणी साचते. दरवर्षी या भागात पाणी साचल्यानंतर प्रशासन तात्पुरती मलमपट्टी करत पाण्यासाठी छोटा मार्ग करत आहे. मात्र, यंदा या ठिकाणी स्कायवॉकचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी पाण्याचा जुना नैसर्गिक मार्ग पूर्णपणे बुजून गेला असून, वस्तीला पाण्याचा वेढा पडला आहे. दरम्यान, प्रशासनाने महामार्ग विभाग यांनी या ठिकाणी पाहणी करत योग्य ते नियोजन करत पावसाचे पाणी साचणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

ओंकार भोजनेच्या गाजलेल्या स्कीटवर विद्या बालन फिदा; स्वतः बनवला रील, व्हिडिओ पाहून नेटकरी खुश

Latest Marathi News Live Update : यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

किरकोळ वाद आता चाकूहल्ल्यांपर्यंत... प्रवाशांमध्ये संताप का वाढतोय? मुंबई लोकलमधील वाढत्या आक्रमकतेचे विश्लेषण

Baramati News : बारामतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पांना गती देण्याचे सुनेत्रा पवार यांचे निर्देश....

SCROLL FOR NEXT