मुंबई

वपुंच्या स्मृतिदिनी विशेष कार्यक्रम

CD

वपुंच्या स्मृतिदिनी विशेष कार्यक्रम
मुंबई, ता. २४ : प्रसिद्ध साहित्यिक आणि कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात ‘वपु’ यांच्या पुण्यतिथीनिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या कन्या आणि प्रसिद्ध लेखिका स्वाती चांदोरकर यांच्या संकल्पनेतून वपु काळे यांच्या २५व्या स्मृतिदिनानिमित्त ‘११ वपुर्झा’ हा कार्यक्रम होत आहे.
आपल्या असंख्य पुस्तकांच्या माध्यमातून वपु आजही मराठी वाचकांच्या घराघरात आहेत. मराठी भाषेत कथाकथन या प्रकाराला त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. लेखनासोबतच वपु चित्रकार होते, उत्तम फोटोग्राफर आणि कलेवर प्रेम असणारे आर्किटेक्ट अशी कितीतरी रूपे या कार्यक्रमातून रसिकांसमोर येणार आहेत.
प्रसिद्ध अभिनेते - निर्माते सुनील बर्वे आणि अभिनेते शशांक केतकर यांच्यासमवेत स्वाती चांदोरकर या विशेष अभिवाचनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शनिवार, २७ जूनला सायंकाळी ७.३० वाजता दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात हा कार्यक्रम पार पडेल. हा कार्यक्रम विनामूल्य असणार आहे. वपूंवर प्रेम करणाऱ्या वाचकांनी आणि रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजनकांतर्फे करण्यात आले आहे.
--------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

ओंकार भोजनेच्या गाजलेल्या स्कीटवर विद्या बालन फिदा; स्वतः बनवला रील, व्हिडिओ पाहून नेटकरी खुश

Latest Marathi News Live Update : यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

किरकोळ वाद आता चाकूहल्ल्यांपर्यंत... प्रवाशांमध्ये संताप का वाढतोय? मुंबई लोकलमधील वाढत्या आक्रमकतेचे विश्लेषण

Baramati News : बारामतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पांना गती देण्याचे सुनेत्रा पवार यांचे निर्देश....

SCROLL FOR NEXT