मुंबई

मालाडमध्ये चाळीवर झाड कोसळून दोघे जखमी; तीन घरांचे नुकसान

CD

मालाडमध्ये चाळीवर झाड कोसळून दोघे जखमी; तीन घरांचे नुकसान
मालाड, ता. २४ (बातमीदार) : मालाड पश्चिमेतील ऑर्लेम परिसरातील बालुजीना चाळ, पटेल कंपाउंड येथे मंगळवारी मध्यरात्री जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ५० वर्षांहून अधिक जुने झाड चाळीवर कोसळल्याने दोन जण जखमी झाले. या दुर्घटनेत चाळीतील तीन घरांचेही मोठे नुकसान झाले.
मंगळवारी रात्री सुमारे १२.४० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. झाड कोसळल्याने तीन घरांच्या भिंतींचे नुकसान झाले. या दुर्घटनेत आलमगीर शेख (४८) आणि दिन मोहम्मद शेख (४५) हे जखमी झाले. आलमगीर शेख यांच्या डोक्याला दुखापत झाली, तर दिन मोहम्मद शेख यांच्या उजव्या हाताला मार लागून सूज आली. सुदैवाने दोघेही गंभीर दुखापतीपासून बचावले.
जखमींना त्यांच्या मालकांनी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करून उपचाराची व्यवस्था केली. तसेच गोकुळ पटेल, विराज शिवणेकर आणि लक्ष्मण पाटील यांच्या घरांचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच रहिवाशांनी पोलिस, अग्निशमन दल आणि पालिका प्रशासनाला कळविले. मात्र, पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी पहाटे सुमारे ४ वाजता घटनास्थळी पोहोचले. त्यांनी झाडाच्या फांद्या कापून परिसर सुरक्षित केला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक रात्री घटनास्थळी पोहोचले नव्हते. त्यांनी बुधवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रतिसादावर प्रश्नचिन्ह
घटनेनंतर मदतीसाठी संपर्क साधूनही यंत्रणा तत्काळ पोहोचली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. जखमींना त्यांच्या मालकांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली. या घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या तत्परतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027: रिषभ पंतने LSG संघानं ट्रेड केल्यानंतर लिहिला फक्त तीन शब्दांचा मेसेज! पाहा काय केली पोस्ट

Mumbai News: कारवाई रोखण्यासाठी कट, न्यायाधीशांचीच मारली सही; न्यायालयाचा धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update : यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

Daund Municipal Outrage: दौंड नगरपालिकेत कंत्राटदार ‘गब्बर’कडून महिला अधिकार्याचा विनयभंग; सर्वांसमोर अश्लील हावभाव

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

SCROLL FOR NEXT