मुंबई

नवीन अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव

CD

कासा, ता. २४ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन असून, यासंदर्भात नागरिक, संस्था आणि संबंधित घटकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. प्रशासकीय सोय आणि नागरिकांना महसूलविषयक सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, डहाणू विभाग यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीर सूचनेनुसार, मौजे कासा येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे. प्रस्तावित कार्यालयाच्या कार्यक्षेत्राबाबतची माहितीही नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या कार्यालयाच्या मुख्यालय निश्चिती, कार्यक्षेत्र किंवा इतर प्रशासकीय बाबींविषयी नागरिकांना काही हरकती अथवा सूचना असल्यास त्या लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हरकती व सूचना नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत, म्हणजेच ७ जुलैपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत.
हरकती व सूचना उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, डहाणू विभाग, डहाणू यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत (सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत) सादर करता येतील.

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

‘गव्हर्नर माझ्यासाठी...’ मनोज बाजपेयींसोबतच्या अनुभवावर चिन्मय मांडलेकरची खास पोस्ट; फोटो व्हायरल!

Latest Marathi News Live Update : केडीएमसी महासभेत सभापतींचा अजब फतवा; इलेक्ट्रॉनिक माध्यमांना प्रवेशबंदी

Mumbai: कायदाच अस्तित्वात नाही, तरी कारवाई का? कोर्टानं राज्य सरकारला ठोठावला दंड

IPL 2027: रिषभ पंतने LSG संघानं ट्रेड केल्यानंतर लिहिला फक्त तीन शब्दांचा मेसेज! पाहा काय केली पोस्ट

SCROLL FOR NEXT