मुंबई

रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण यशस्वी

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (बीडीबीए) रुग्णालयाने सार्वजनिक आरोग्यसेवेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत पहिल्यांदाच दोन रुग्णांवर रोबोटिक टोटल नी रिप्लेसमेंट (गुडघा प्रत्यारोपण) शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. विशेष म्हणजे, खासगी रुग्णालयांमध्ये सुमारे चार लाख रुपये खर्च येणाऱ्या या शस्त्रक्रिया रुग्णालयात पूर्णपणे मोफत करण्यात आल्या.

अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. अमित धोंड यांच्या नेतृत्वाखाली शस्त्रक्रिया विभाग, भूलतज्ज्ञ, परिचारिका आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण ही आधुनिक अस्थिरोग शस्त्रक्रियेमधील अत्याधुनिक पद्धत मानली जाते. या तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेतील अचूकता वाढते, कृत्रिम सांध्याचे योग्य बसविणे शक्य होते, मऊ ऊतींचे नुकसान कमी होते आणि रुग्णाचा पुनर्वसनाचा कालावधीही कमी होतो.

रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, या शस्त्रक्रियांसाठी आवश्यक असलेली ‘क्युविस’ रोबोटिक प्रणाली बायोरॅड मेडिसिस (क्युरेक्सो) कंपनीने विनामूल्य उपलब्ध करून दिली. त्यामुळे दोन्ही रुग्णांना अत्याधुनिक उपचार मोफत देता आले. या यशामुळे बीडीबीए रुग्णालय सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत प्रगत वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया सेवांचे केंद्र म्हणून उदयास येत असून, भविष्यातही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा रुग्णालयाचा निर्धार आहे.

आठ वर्षांच्या वेदनांपासून दिलासा
५२ वर्षीय नागम्मा हिराणा या गेल्या आठ वर्षांपासून दोन्ही गुडघ्यांच्या तीव्र वेदनांनी त्रस्त होत्या. मागील पाच वर्षांपासून त्यांना चालताना मोठा त्रास होत होता. गुडघ्यांमध्ये गंभीर विकृती निर्माण झाल्याने पाय वाकडे झाले होते आणि दैनंदिन कामे करणेही कठीण झाले होते. दोन्ही गुडघ्यांच्या संधिवाताचे निदान झाल्यानंतर त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला होता; मात्र आर्थिक अडचणींमुळे त्या उपचार घेऊ शकल्या नव्हत्या. बीडीबीए रुग्णालयात त्यांच्या उजव्या गुडघ्यावर मोफत रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.

दैनंदिन कामांवर परिणाम
निर्मला कोळी या रुग्णाला गेल्या पाच वर्षांपासून दोन्ही गुडघ्यांमध्ये वेदना होत होत्या. चार वर्षांपासून चालण्यास अडचण निर्माण झाली होती, तर मागील दोन वर्षांपासून दैनंदिन कामे करणेही कठीण झाले होते. त्यांच्या डाव्या गुडघ्यावर रोबोटिक पद्धतीने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil and Devendra Fadnavis : शरद पवारांचे खासदार दिल्लीत नरेंद्र मोदींच्या भेटीला जाण्यापूर्वी जयंत पाटील-फडणवीसांचा एकत्र विमान प्रवास; राजकीय चर्चांना उधाण

IND vs SLC XI Warm up: बोटाला दुखापत झालेल्या शुभमन गिलचं मैदानात कमबॅक, आता पहिल्या कसोटीत खेळणार?

Thane News: ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मालमत्ता कर तसेच टीएमटीचे तिकीट दरवाढ करण्याचा प्रस्ताव

मला मराठ्यांपासून लांब ठेवण्याचा पूर्वनियोजित कट; मनोज जरांगे आक्रमक, सरकारवर सडकून टीका

Marathi News Live Updates : ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर हल्ला, कारवर फेकला चिखल

SCROLL FOR NEXT