मुंबई

अंबोजवाडीतील वीज उपकेंद्रामध्‍ये पावसाचे पाणी

CD

अंबोजवाडीतील वीज उपकेंद्रामध्‍ये पावसाचे पाणी; संपूर्ण वस्ती अंधारात
मालाड, ता. २४ (बातमीदार) : मालाड पश्चिमेतील मालवणी गेट क्रमांक ८ येथील अंबोजवाडी भाभरेकर नगर परिसरात मंगळवारी (ता. २३) रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसामुळे विजेच्‍या उपकेंद्रामध्‍ये पावसाचे पाणी शिरल्याने उपकेंद्र बंद पडले आणि संपूर्ण परिसर अंधारात बुडाला.
अचानक पावसाचे पाणी शिरल्यामुळे वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्राचे कामकाज ठप्प झाले. परिणामी अंबोजवाडी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेला वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार बुधवारी दुपारी सुमारे ४ वाजेपर्यंत कायम होता, त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
वीज नसल्यामुळे पाण्याच्या मोटारी बंद पडल्या आणि नागरिकांना पिण्याचे पाणी भरता आले नाही. तसेच रात्रभर मच्छरांच्या त्रासामुळे रहिवाशांना झोपही घेता आली नाही. वीज नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची पुरेशी झोप न झाल्याने त्यांची शाळाही हुकल्याचे स्थानिकांनी सांगितले.
या घटनेदरम्यान कोणताही नेता किंवा लोकप्रतिनिधी परिसरात फिरकला नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली. मात्र बुधवारी सकाळी स्थानिक नगरसेविका परिसरात दाखल झाल्या आणि त्यांनी अदाणी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस नेत्याची भरदिवसा हत्या, आरोपीवर पोलिसांचा गोळीबार; झटापटीत पोलिस निरीक्षक जखमी

कर्नाटकात काँग्रेसचा रोज नवा खेळ, मंत्रिमंडळात पुन्हा फेरबदलाची शक्यता; नाराजी दूर करण्यासाठी हालचाली

Nagpur Temple Theft Video : देवळात चोरी करण्यापूर्वी कान पकडून माफी मागितली; पण देवाने बरोबर केली शिक्षा पळून जाताना अपघात, नागपुरातील व्हिडिओ व्हायरल

AI Conversation : पावसाच्या आठवणींवर एआयशी गप्पा; संवादातून दिसली नवी झलक

Dharmendra Pradhan On Resignation जेन झींची दिशाभूल केली, राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधानांनी सोडलं मौन; पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT