मुंबई

कांदळवन कारवाई संशयाच्या भोवऱ्यात

CD

कांदळवन कारवाई संशयाच्या भोवऱ्यात
वरिष्ठांच्या चौकशीच्या संकेताने कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २४ : अलिबाग कोळीवाडा परिसरातील कांदळवन क्षेत्रावरील अतिक्रमणाविरोधात वन विभागाच्या कांदळवन अतिक्रमणविरोधी पथकाने २७ मे रोजी कारवाई केली. मात्र, परिसरातील इतर अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करून केवळ एका व्यक्तीवरच कारवाई करण्यात आल्याचा आरोप पुढे येत असून, वन विभागाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कारवाई झालेले प्रकाश भगत यांनी वन विभागाच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला आहे. आमच्याकडून नियमभंग झाला असेल, तर कारवाई व्हायलाच हवी; मात्र त्याच परिसरातील इतर अतिक्रमणांवर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, तुमच्या विरोधात तक्रार प्राप्त झाल्यामुळे कारवाई करण्यात आली, असे उत्तर देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
स्थानिकांच्या माहितीनुसार, कोळीवाडा परिसरात १० ते १२ ठिकाणी कांदळवन क्षेत्रात भराव टाकून अतिक्रमणे करण्यात आली आहेत. उच्च न्यायालयाच्या २००५ नंतरच्या आदेशानुसार अशा अतिक्रमणांचे तातडीने निर्मूलन करणे आवश्यक असताना निवडक व्यक्तींवरच कारवाई झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
याप्रकरणी अलिबागचे कांदळवन वन परिक्षेत्र अधिकारी कुलदीप पाटकर यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अतिक्रमणांच्या बाबतीत विभागातील कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे आढळल्यास संबंधितांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यानंतर वन विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
---
वन कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर संशय
वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या वक्तव्यामुळे वन विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवरच संशयाची सुई फिरू लागली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता निर्माण झाली असून, अनेकांचे धाबे दणाणल्याची चर्चा सुरू आहे. निवडक कारवाईच्या आरोपांची चौकशी झाल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अलिबाग कोळीवाडा परिसरात झालेल्या कारवाईपेक्षा कारवाईच्या पद्धतीवरच अधिक प्रश्न उपस्थित होत आहेत.
---
पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष
एकाच स्वरूपाच्या अतिक्रमणांवर समान निकषांनुसार कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत असून, आगामी काळात कोळीवाडा, कुरूळसह अन्य भागांतील अतिक्रमणांवरही मोठ्या प्रमाणावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या परिसरात कांदळवनाची तोड करुन मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत. या अतिक्रमणांवर अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांचे लक्ष आता वनविभागाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.
---
वन विभागाने अतिक्रमण हटविल्यानंतर संबंधित जागांवर पुन्हा कांदळवनांची लागवड करून संवर्धनाची मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच कांदळवन क्षेत्रातील अतिक्रमणांबाबत माहिती असल्यास नागरिकांनी ती तातडीने वन विभागाकडे द्यावी.
- कुलदीपक पाटकर, कांदळवन वन परिक्षेत्र अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

‘गव्हर्नर माझ्यासाठी...’ मनोज बाजपेयींसोबतच्या अनुभवावर चिन्मय मांडलेकरची खास पोस्ट; फोटो व्हायरल!

Latest Marathi News Live Update : केडीएमसी महासभेत सभापतींचा अजब फतवा; इलेक्ट्रॉनिक माध्यमांना प्रवेशबंदी

Mumbai: कायदाच अस्तित्वात नाही, तरी कारवाई का? कोर्टानं राज्य सरकारला ठोठावला दंड

IPL 2027: रिषभ पंतने LSG संघानं ट्रेड केल्यानंतर लिहिला फक्त तीन शब्दांचा मेसेज! पाहा काय केली पोस्ट

SCROLL FOR NEXT