मुंबई

पहिल्याच पावसात पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल

CD

पहिल्याच पावसात पालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल
चेंबूर, गोवंडी, मानखुर्दसह अनेक भाग जलमय
चेंबूर, ता. २४ (बातमीदार) : मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम पूर्ण झाल्याचा दावा केला असला, तरी मॉन्सूनच्या पहिल्याच जोरदार पावसात चेंबूर, टिळकनगर, गोवंडी, मानखुर्द, कुर्ला, माहुल आणि वाशी नाका परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पालिकेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
मुंबई उपनगरातील नालेसफाईसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. यंदाही पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, पहिल्याच मुसळधार पावसाने हा दावा फोल ठरल्याचे चित्र अनेक भागांत पाहायला मिळाले.
चेंबूरमधील एन. जी. आचार्य मार्ग, टेंबे उड्डाणपूल, वाशी नाका, शंकर मंदिर मार्ग तसेच टिळक नगर, माहुल, गोवंडी, मानखुर्द आणि कुर्ला परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. काही ठिकाणी पादचाऱ्यांना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागला, तर वाहनचालकांनाही वाहतुकीत अडथळ्यांचा सामना करावा लागला.
गोवंडीतील डम्पिंग ग्राउंड परिसर, सिद्धार्थ कॉलनी, देवनार कत्तलखाना परिसर आणि अन्य सखल भागांमध्ये पाण्याचा निचरा न झाल्याने रस्ते जलमय झाले. सायन-चुनाभट्टी परिसरातील एव्हरार्डनगर भुयारी मार्ग नेहमीप्रमाणे यंदाही पाण्याखाली गेला.
स्थानिक नागरिकांच्या मते, अनेक नाल्यांमध्ये अजूनही गाळ, माती, दगड आणि प्लॅस्टिक कचरा साचलेला असून, नालेसफाई केवळ वरवर करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी नाल्यांमधून वाहून जाण्याऐवजी रस्त्यांवर आणि सखल भागांत साचत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ठेकेदारांची चौकशी करा!
पालिकेने नालेसफाईवर खर्च केलेल्या निधीचा हिशेब जाहीर करावा. तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मॉन्सूनच्या सुरुवातीलाच निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे आगामी काळात मुंबईकरांना आणखी किती त्रास सहन करावा लागणार, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT