मुंबई

मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर झाड कोसळले.

CD

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर झाड कोसळले
काही वेळ वाहतूक कोंडी
खालापूर, ता. २४ (बातमीदार) ः जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोधिवली गावाजवळ एक मोठे झाड कोसळल्याने बुधवारी (ता. २४) सकाळी वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. खालापूर पोलिस हद्दीत लोधिवली गावानजीक मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हे झाड रस्त्याच्या मधोमध कोसळले होते. ऐन गर्दीच्या वेळी महाकाय झाड रस्त्यावर आल्यामुळे पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती.
या घटनेची माहिती मिळताच खालापूर पोलिस कर्मचारी, हेल्प फाउंडेशन सदस्य तातडीने घटनास्थळी पोहोचले. पुलाखालील आणि महामार्गावरील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता, पोलिसांनी तात्काळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेतून (लेन) पुण्याच्या दिशेने जाणारी वाहने वळवली आणि वाहतूक अंशतः सुरू ठेवली. रस्त्याच्या मधोमध पडलेले झाड अत्यंत मोठे असल्याने ते बाजूला करण्यासाठी तात्काळ हायड्रा मशीन पाचारण करण्यात आले. पोलिस कर्मचारी आणि हेल्प फाउंडेशनच्या सदस्यांनी अथक प्रयत्न करून हायड्राच्या साहाय्याने झाड रस्त्यावरून बाजूला हटवले. रस्ता पूर्णपणे मोकळा झाल्यानंतर या महामार्गावरील वाहतूक पुन्हा पूर्ववत व सुरळीत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: कायदाच अस्तित्वात नाही, तरी कारवाई का? कोर्टानं राज्य सरकारला ठोठावला दंड

IPL 2027: रिषभ पंतने LSG संघानं ट्रेड केल्यानंतर लिहिला फक्त तीन शब्दांचा मेसेज! पाहा काय केली पोस्ट

Latest Marathi News Live Update : अमरावतीत मान्सूनच्या पहिल्याच पावसात नालेसफाईची पोलखोल

Mumbai News: बेस्टला पालिकेची मदत, ताफ्यात २७५ नव्या ई बस, १७० कोटी पुनर्विकासाचे मिळणार

Mumbai News: कारवाई रोखण्यासाठी कट, न्यायाधीशांचीच मारली सही; न्यायालयाचा धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT