मुंबई

राज्यातील विद्यार्थ्यांची अपार आयडी नोंदणी पूर्ण कधी होणार

CD

विद्यार्थ्यांची अपार आयडी नोंदणी कधी पूर्ण होणार
आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची अधिवेशनात मागणी
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २४ : राज्यातील विद्यार्थ्यांची ‘अपार आयडी’ निर्मिती प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला. राज्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थी अपार आयडीपासून वंचित असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या प्रश्नात राज्यातील सुमारे २३ लाख ४९ हजार ७३१ विद्यार्थी अपार आयडीपासून वंचित असल्याचे, तसेच मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, लातूर व अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये नोंदणीचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. शाळा स्तरावरील पाठपुरावा, तांत्रिक अडचणी व जनजागृतीचा अभाव यामुळे प्रक्रिया धीम्या गतीने सुरू असल्याचा मुद्दाही मांडण्यात आला होता.
या प्रश्नावर शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, हे खरे आहे की अपार आयडी नोंदणी प्रक्रियेत काही विद्यार्थी अद्याप वंचित आहेत. तथापि, २०२५-२६ च्या यू-डायस प्लस माहितीनुसार राज्यातील ८९.०८ टक्के विद्यार्थ्यांची अपार आयडी नोंदणी पूर्ण झाली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी नोंदणीसाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच संबंधित जिल्ह्यांमध्येही ८५ टक्क्यांहून अधिक नोंदणी पूर्ण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी केंद्रप्रमुख, तालुका एमआयएस समन्वयक आणि जिल्हा संगणक प्रोग्रामर यांच्यामार्फत शाळांना तांत्रिक सहाय्य दिले जात आहे. आधार संबंधित त्रुटी दूर करण्यासाठी पोस्ट ऑफिसमार्फत प्रत्येक तालुक्यात आधार मशीन व ऑपरेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर सतत समन्वय साधून नोंदणी प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांची डिजिटल शैक्षणिक ओळख व शिष्यवृत्ती तसेच शासकीय योजनांचा लाभ सुलभ करण्यासाठी ‘अपार आयडी’ अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही या उत्तरात अधोरेखित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand Protest : JPSC-JSSC वाद पेटला, आंदोलक विद्यार्थी तारेचे कुंपण भेदून विधानसभेसमोर पोहोचले, पोलिसांकडून लाठीचार्ज

Investment In IPL Team: आयपीएल टीममध्ये गुंतवणूक कशी कराल? कोणत्या संघाचे शेअर्स उपलब्ध? स्टेप बाय स्टेप माहिती...

अरेच्चा! डोंबिवलीच्या आहेत ऐश्वर्या नारकर; शाळेचं नाव वाचून विश्वास बसणार नाही; म्हणाल्या- आई खिडकीतून डब्बा...

RINKU SINGH LOVE STORY: एका ‘लाईक’पासून सुरू झाली लव्हस्टोरी; प्रियाने सांगितला रिंकूसोबतच्या पहिल्या भेटीचा भन्नाट किस्सा

Independence Day 2026: 15 ऑगस्टला अनुभवा खरा इतिहास! यंदाच्या स्वातंत्र्यदिनी 'या' ऐतिहासिक ठिकाणांना नक्की भेट द्या...

SCROLL FOR NEXT