मुंबई

शाळांमध्येही स्वच्छता विषयक जनजागृती

CD

शाळांमध्येही स्वच्छताविषयक जनजागृती
थ्री आर सेंटरची माहिती
नेरूळ, ता. २४ (बातमीदार)ः स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ अंतर्गत नवी मुंबई महापालिकेकडून १५ ते ३० जूनदरम्यान विविध स्वच्छता व जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. लोकसहभाग वाढविण्यावर भर देत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून विशेष स्वच्छता मोहिमा आयोजित करण्यात आल्या आहेत.
परिमंडळ १ मध्ये सेक्टर ५, सानपाडा येथील नवी मुंबई महापालिका शाळेत विद्यार्थ्यांना कचरा वर्गीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. घरातूनच ओला, सुका, घातक आणि स्वच्छताविषयक कचरा अशा चार प्रकारांत वर्गीकरण करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. शिक्षक, विद्यार्थी, स्वच्छता दूत आणि स्वच्छता निरीक्षक मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले.
दरम्यान, परिमंडळ २ मध्ये विविध थ्री आर सेंटर्समध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ऐरोली, कोपरखैरणे, घणसोली इत्यादी भागांतील केंद्रांमध्ये स्वच्छता करून साहित्याची योग्य मांडणी करण्यात आली. या मोहिमेत स्वच्छतादूत, पर्यवेक्षक आणि अधिकारी सहभागी झाले होते.
चौकट
थ्री आर सेंटर्स उपयुक्त
‘नको असेल ते द्या, हवे असेल ते घ्या’ या संकल्पनेवर आधारित थ्री आर सेंटर्स नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत. घरातील सुस्थितीतील कपडे, पुस्तके, भांडी व इतर उपयुक्त वस्तू येथे जमा केल्या जातात. गरजू नागरिक त्या विनामूल्य घेऊन वापरू शकतात. त्यामुळे पुनर्वापराला चालना मिळत असून कचऱ्यात जाणाऱ्या वस्तूंना नवजीवन मिळत आहे. पर्यावरण संरक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम स्वच्छ शहराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

ओंकार भोजनेच्या गाजलेल्या स्कीटवर विद्या बालन फिदा; स्वतः बनवला रील, व्हिडिओ पाहून नेटकरी खुश

Latest Marathi News Live Update : यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

किरकोळ वाद आता चाकूहल्ल्यांपर्यंत... प्रवाशांमध्ये संताप का वाढतोय? मुंबई लोकलमधील वाढत्या आक्रमकतेचे विश्लेषण

Baramati News : बारामतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पांना गती देण्याचे सुनेत्रा पवार यांचे निर्देश....

SCROLL FOR NEXT