मुंबई

ऐरोलीतील मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मागणी

CD

ऐरोलीतील मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मागणी
स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांचा महासभेत ठराव
वाशी, ता. २४ (बातमीदार)ः नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली विभागातील प्रभाग क्रमांक ५ मधील प्रमुख चौक, सर्कल तसेच गर्दीच्या ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी सोमवारी (ता. २२) स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरावाच्या माध्यमातून केली. शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही उपाययोजना आवश्यक असल्याचे त्यांनी सभागृहात नमूद केले.
या वेळी बोलताना अशोक पाटील यांनी ऐरोली हे नवी मुंबईचे महत्त्वाचे प्रवेशद्वार असल्याचे सांगितले. ठाणे आणि मुंबईकडून येणाऱ्या नागरिकांची तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा या परिसरातून होत असते. त्यामुळे दिवा गाव सर्कल, सेक्टर-१० परिसर, प्रमुख रस्ते, चौक आणि इतर गर्दीच्या भागांमध्ये सातत्याने देखरेख ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सीसीटीव्ही यंत्रणा ही केवळ गुन्हे उघडकीस आणण्यासाठीच नव्हे तर गुन्हे रोखण्यासाठीही प्रभावी साधन ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थेवरदेखील नियंत्रण ठेवता येईल तसेच आपत्कालीन परिस्थितीत संबंधित यंत्रणांना त्वरित मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
या ठरावाची दखल घेत प्रशासनाने संबंधित विभागामार्फत पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याबाबत कार्यवाही करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: कायदाच अस्तित्वात नाही, तरी कारवाई का? कोर्टानं राज्य सरकारला ठोठावला दंड

IPL 2027: रिषभ पंतने LSG संघानं ट्रेड केल्यानंतर लिहिला फक्त तीन शब्दांचा मेसेज! पाहा काय केली पोस्ट

Latest Marathi News Live Update : अमरावतीत मान्सूनच्या पहिल्याच पावसात नालेसफाईची पोलखोल

Mumbai News: बेस्टला पालिकेची मदत, ताफ्यात २७५ नव्या ई बस, १७० कोटी पुनर्विकासाचे मिळणार

Mumbai News: कारवाई रोखण्यासाठी कट, न्यायाधीशांचीच मारली सही; न्यायालयाचा धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT