मुंबई

पावसात पंचायत समितीसमोर उपोषण

CD

पावसात पंचायत समितीसमोर उपोषण
लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
कर्जत, ता. २४ (वार्ताहर) : कर्जत तालुक्यातील जिते गावातील रहिवासी अमित जाधव यांनी घराशेजारी करण्यात आलेल्या कथित बेकायदा अतिक्रमणाविरोधात पंचायत समिती कर्जत कार्यालयासमोर बुधवारी (ता. २४) बेमुदत उपोषण सुरू केले. संबंधित प्रकरणात वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. चर्चेनंतर ग्रामपंचायतीने संबंधित अनधिकृत भिंतीचे बांधकाम ८ जुलैपर्यंत हटविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर अमित जाधव यांनी सुधाकर घारे, बाबू घारे आणि जगदीश ठाकरे यांच्या हस्ते उपोषण मागे घेत आंदोलन स्थगित केले.
अमित जाधव यांनी प्रकाश यशवंत जाधव यांनी त्यांच्या घरालगत अतिक्रमण केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत तसेच गटविकास अधिकाऱ्यांकडे त्यांनी अनेकदा तक्रारी करून अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती. मात्र, कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.
उपोषणाची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती सुधाकर घारे, जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे, जगदीश ठाकरे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन जाधव यांची बाजू जाणून घेतली. या वेळी जिते ग्रामपंचायतीच्या सरपंच रेणुका मुरकुटे, उपसरपंच हनुमंत गायकवाड आणि ग्रामपंचायत अधिकारी संजय राठोड यांनीही उपस्थित राहून चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: कायदाच अस्तित्वात नाही, तरी कारवाई का? कोर्टानं राज्य सरकारला ठोठावला दंड

IPL 2027: रिषभ पंतने LSG संघानं ट्रेड केल्यानंतर लिहिला फक्त तीन शब्दांचा मेसेज! पाहा काय केली पोस्ट

Latest Marathi News Live Update : अमरावतीत मान्सूनच्या पहिल्याच पावसात नालेसफाईची पोलखोल

Mumbai News: बेस्टला पालिकेची मदत, ताफ्यात २७५ नव्या ई बस, १७० कोटी पुनर्विकासाचे मिळणार

Mumbai News: कारवाई रोखण्यासाठी कट, न्यायाधीशांचीच मारली सही; न्यायालयाचा धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT