मुंबई

जेएनपिए सेवा मार्गांवर जीवघेणे खड्डे

CD

जेएनपीए सेवा मार्गावर जीवघेणे खड्डे
उरण, ता. २३ (बातमीदार) ः जेएनपीए कोस्टल रोडला जोडणाऱ्या सेवा मार्गावर (सर्व्हिस रोड) जड कंटेनर वाहतुकीमुळे मोठमोठे आणि जीवघेणे खड्डे पडले आहेत. या वाढत्या खड्ड्यांमुळे कधीही एखादा भीषण अपघात होऊन वाहनचालकाचा जीव जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
जेएनपीए महामार्गावरून देशातील सर्वोच्च आयात-निर्यातीसाठी अहोरात्र अवजड कंटेनर्सची वाहतूक होत असते. कोस्टल रोडमार्गे जेएनपीए बंदराकडे जाणारी आणि बंदरातून बाहेर पडून विविध सीएफएस व गोदामांकडे जाणारी शेकडो वाहने याच सेवा मार्गाचा वापर करतात. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या सेवा मार्गावरील खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांच्या खोलीचा आणि आकाराचा कोणताही अंदाज येत नाही. यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता, या सेवा मार्गावरील खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: ‘गॉलचे किंग्स’ कोण? भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरतोय ‘हा’ विक्रम; आकडे पाहून बसेल धक्का!

Mumbai News : चार महिने झाले... आई अजूनही दाराकडे पाहतेय; ‘अब्दुल’ कुठे आहे?

Latest Marathi News Live Update : स्वातंत्र्यदिनानिमित्त बीबी का मकबऱ्याला मनमोहक तिरंगी रोषणाई

Stray Dogs : भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर! ठाणे जिल्ह्यात स्वतंत्र ‘डॉग शेल्टर’ उभारा

Shirur Market Committee Election : शिरूर बाजार समितीची निवडणूक तात्काळ घ्या; काँग्रेस पक्षाची मागणी

SCROLL FOR NEXT