इमारतींचा संरचनात्मक लेखा परीक्षण अहवाल सादर करण्याचे निर्देश
१ जुलैपासून कचरा वर्गीकरण नियम लागू
रोहा, ता. २४ (बातमीदार) : रोह्यात पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ३० किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे जुनी असणारी सदनिका किंवा सोसायटीच्या इमारतींचे अभियंत्यामार्फत संरचनात्मक लेखा परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करून ते अहवाल नगरपालिका कार्यालयात १५ जुलैपर्यंत सादर करावेत, असे आदेश नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी दिले.
१ जुलैपासून रोहे अष्टमी विभागात ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरण नियम लागू करण्यात येणार आहे. वर्गीकरण न केलेला कचरा नगरपालिकेचे कर्मचारी स्वीकारणार नाही, असेदेखील त्यांनी सांगितले. हा उपक्रम यशस्वी करून नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नगरध्यक्षा वनश्री शेडगे यांनी केले आहे.
रोहा अष्टमीच्या वतीने मंगळवारी (ता. २३) चित्रफितीद्वारे पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, नागरिकांची सुरक्षितता, जलसंवर्धन तसेच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या संभाव्य आव्हानांना सामोरे जाणण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन व जनजागृती करण्याच्या उद्देशाने सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था, हाउसिंग सोसायटी, अपार्टमेंट आणि इमारत व्यवस्थापन समित्यांना माहिती देण्यात आली. या नियोजित संयुक्त बैठकीत नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी मार्गदर्शन करीत असताना सांगितले.
या वेळी नगरपालिकेचे उपाध्यक्ष अहमद दर्जी, मुख्याधिकारी अजय कुमार एडके, प्रमुख मार्गदर्शक सुखद राणे, गटनेते महेंद्र गुजर, सभापती राजेंद्र जैन, मयूर दिवेकर, रवींद्र चाळके, महेश कोलटकर, नीता हजारे, गौरी बारटक्के, नगरसेवक अजित मोरे, अरबाज मनेर, रोशन चाफेकर, नगरसेविका पूर्वा मोहिते, प्रियांका धनावडे, स्नेहा आंब्रे, सुप्रिया जाधव आणि शहरातील असंख्य सोसायट्यांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.