उल्हासनगर, ता. २४ (बातमीदार) : गृह विभागाने राज्यातील पोलिस निरीक्षक संवर्गातील २२४ अधिकाऱ्यांना नियमित निवडसूचीनुसार पोलिस उपअधीक्षक तथा सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) पदावर पदोन्नती दिली आहे. या पदोन्नतीमध्ये उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर आवताडे आणि विठ्ठलवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पडवळ यांचा समावेश आहे.
पदोन्नतीनंतर शंकर आवताडे यांना ठाणे शहर विभागात, तर अनिल पडवळ यांना मुंबई विभागात एसीपी पदाची जबाबदारी दिली आहे. आवताडे यांनी मध्यवर्ती पोलिस ठाण्याचा पदभार सांभाळताना अनेक संवेदनशील गुन्हे, आंदोलने, मोर्चे; तसेच महापालिकेशी संबंधित विविध कायदा-सुव्यवस्थाविषयक परिस्थिती प्रभावी हाताळल्या आहेत. त्यांच्या कार्यकाळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तर पडवळ यांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाणे आणि त्यानंतर विठ्ठलवाडी वाहतूक शाखेचा पदभार यशस्वीपणे सांभाळला. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन, जनजागृती आणि शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्थापनासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण झाली. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीबद्दल पोलिस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.