मुंबई

हिंसेबद्दल आपली संवेदनशीलता कमी झाली आहे का?

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादातून मंगळवारी एका प्रवाशाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर रेल्वेच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र, किरकोळ कारणावरून जीवानिशी मारण्याचा प्रकार आजकाल आपल्या समाजात न्यू नॉर्मल का झाला? तिथे उपस्थित असलेल्या सहप्रवाशांनी आरोपीला अडवण्याची हिंमत का केली नाही? समाज म्हणून आपली संवेदनशीलता गमावली आहे का? असे असंख्य प्रश्न या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात.

एकूणच आजच्या समाजात हिंसेबद्दल संवेदनशीलता कमी झाल्याचे चित्र आहे. कारण, आजूबाजूला समाजमाध्यमे, वेबसीरिज, पॉडकास्ट यामधून हिंसेला ग्लॅमराईज करण्यात आले आहे. सर्वत्र हिंसेकडे आपण न्यू नॉर्मल पद्धतीने बघतो. त्याबद्दलची आपली संवेदनशीलता कमी झाली आहे. त्यामुळे हिंसा करण्याऱ्याची आणि बघ्यांचा दृष्टिकोन एकसारखा झाल्याचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विभावरी पाटील यांनी सांगितले. या प्रकरणात तातडीने ॲक्ट करून त्याला थांबवता आले असते किंवा आजकाल सर्वांकडे स्मार्टफोन आहेत. याचा वापर करून कुणालातरी इमर्जन्सी फोन करता आला असता, किमान आरोपी पकडला गेला नसता तरी व्यक्तीचे प्राण वाचू शकले असते, याचे भानही त्या डब्यात उपस्थित व्यक्तींना नव्हते. हे समाज म्हणून वाईट आहे, असे त्या म्हणाल्या.

हल्ली समाजात डि-ह्युमनाईज म्हणजे पुढचा व्यक्ती हा माणूसच नाही हे समजून न घेण्याचा प्रकार वाढला आहे. पुढचा व्यक्ती हाडामासाचा आहे, त्याला मारल्यास त्रास होईल, ही भावनाच डोक्याबाहेर काढल्यानंतर काहीच उरत नाही. मग एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे आपण त्याला ट्रिट करतो. त्यामुळे एखाद्यामुळे अडचण किंवा त्रास झाला, तर त्याला वस्तूप्रमाणे फेकून देण्याची वृत्ती अलीकडे समाजात बळावली आहे. यावर डॉ. विभावरी पाटील यांनी लक्ष वेधले.

निर्णय प्रकिया
आताची पिढी स्मार्ट झाली आहे. मात्र, त्यांना अचूक निर्णय घेता येत नाही किंवा निर्णय घेताना ते सारासार विचार करत नाही. मुंबई लोकलच्या घटनेत चाकू मारताना किंवा काढताना त्याचे परिणाम का होईल किंवा हा खरंच एवढा मोठा प्रश्न आहे का? याबद्दल त्या आरोपीने काही सेंकद विचार केला असता तरी कदाचित पुढच्या व्यक्तीचा जीव वाचू शकला असता.

आजकाल लोक एवढे स्वमग्न झालेत की हातात मोबाईल आणि कानात इयर पॉड घालून आजबाजूला काय सुरू असते ते त्यांना माहिती नसते किंवा त्याची फिकीरही नसते. भावनांवर नियंत्रण उरले नाही. त्यामुळे एकंदरीत हिंसाचाराच्या घटना आता आता न्यू नॉर्मल होत चालल्या आहेत.
- डॉ. विभावरी पाटील, मानसोपचारतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

IND vs ENG, T20I: एकट्या वैभव सूर्यवंशीसाठी इंग्लंडमध्ये वेगळी ड्रेसिंग रुम असणार! पण नेमकं यामागे खरं कारण काय?

Latest Marathi News Live Update : शेती उपसा सिंचन योजनेसाठी वीज कनेक्शन मिळावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण

निळावंतीचं रहस्य आणि गुप्त खजिन्याचा शोध! ब्रिटिशकालीन इतिहासावर आधारित 'इंद्रजाल'चा थरारक फर्स्ट लुक आउट

Solapur Water Rights: दुष्काळी १३ तालुक्यांसाठी ३४ वी पाणी संघर्ष परिषद २६ जूनला मंगळवेढ्यात

SCROLL FOR NEXT