मुंबई

रहिवाशांची रात्र जागून काढली

CD

रहिवाशांनी रात्र जागून काढली
एमएचबी कॉलनीतील घरांमध्ये पावसाचे पाणी
मालाड, ता. २४ (बातमीदार) : मालाड पश्चिमेतील एमएचबी कॉलनी परिसरातील चाळींमध्ये मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने रहिवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला.
एमएचबी चाळ क्रमांक ७६ मधील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. पावसाने उशिरा का होईना पण जोरदार हजेरी लावत पालिकेच्या गटार सफाईच्या कामांची पोलखोल केल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. मालाड परिसरातील अनेक गटारे व नाले तुंबल्याने घाण पाणी थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
स्थानिक पत्रकार आणि रहिवासी अब्दुल समद शेख यांच्या घरातही पावसाचे पाणी शिरले होते. ते आणि त्यांच्या कुटुंबीयांनी रात्रभर घरातील पाणी उपसण्याचे काम केले. मात्र, परिसरातील गटारे तुंबल्यामुळे घरातील पाणी उपसूनही पुन्हा घरात पाणी साचत असल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. रात्रभर या समस्येकडे कोणत्याही यंत्रणेने दखल घेतली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला. मात्र, सकाळी अस्लम शेख यांनी अब्दुल समद शेख यांच्याशी दोन वेळा दूरध्वनीवर संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी कर्मचारी पाठवून परिसराची साफसफाई करून घेतल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, स्थानिक नगरसेवक रफिक शेख यांनी या समस्येकडे कोणतीही दखल घेतली नसल्याची खंत अब्दुल समद शेख यांनी व्यक्त केली. स्थानिक नागरिकांनी भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने उपाययोजना करून गटारे व नाल्यांची नियमित साफसफाई करावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT