मुंबई

हल्लेखोराला प्रवाशांनी अडवले असते तर माझा मुलगा वाचला असता; आमचे घरच पूर्ण उद्धवस्थ झाले

CD

...तर माझा मुलगा वाचला असता
दुःखाचा हंबरडा फोडत मयंक लोहारच्या आईचा उद्विग्न सवाल
विजय गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नालासोपारा, ता. २४ ः ‘‘माझ्या मुलावर चाकूने वार होत असताना डब्यात अनेक प्रवासी होते; पण कोणीच पुढे आले नाही. कुणी धाडस करून त्या हल्लेखोराला रोखले असते, तर आज माझा मुलगा माझ्यासोबत असता,’’ असे म्हणत मयंक लोहारच्या आईने आक्रोश व्यक्त केला. कालपर्यंत ज्या घरात मयंकच्या हास्याचे स्वर घुमत होते, त्या घरात आज केवळ अश्रू, हुंदके आणि काळीज पिळवटून टाकणारी शांतता पसरली आहे. एका क्षुल्लक वादातून लोकलमध्ये झालेल्या या निर्घृण हत्येने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, बघ्याची भूमिका घेणाऱ्यांमुळे अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न उभे राहिले आहेत.

विरार पूर्व भोईर पाडा सुरम पार्क येथील अमरनाथ अपार्टमेंटमधील ए विंगच्या ३०१ रूममध्ये मयंक लोहार आपल्या कुटुंबीयांसह राहत होता. त्याच्या घरात आई, वडील, बहीण आणि एक लहान भाऊ आहे. मंगळवारी रात्री अंधेरी ते बोरिवली प्रवासादरम्यान चाकूने वार करून त्याची लोकलमध्ये निर्घृणपणे हत्या झाली. रात्री साडेअकराच्या सुमारास त्याच्या कुटुंबीयांना याची बातमी कळताच संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मयंकच्या हत्येचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हत्याऱ्याने सपासप वार करून, चाकू हातात घेऊन प्रथम वर्गाच्या डब्यात फिरतोय. घाबरलेले प्रवासी दार खिडक्याला चिटकून उभे राहिले आणि रक्ताच्या थारोळ्यात मयंक (वय २१) पडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. जर प्रवाशांनी हिंमत करून माथेफिरू आरोपीला आडवले असते, तर मयंक वाचला असता आणि एका कुटुंबावर आज एवढा दुःखाचा डोंगर कोसळला नसता, असा प्रत्येकाला प्रश्न पडला आहे.

मयंक हा शांत, साधा आणि मेहनती तरुण होता. तो कॉमर्सच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. वडील ओला-उबरचे चालक आहेत. घरात आर्थिक टंचाई सुरू असल्याने वडिलांना हातभार लागावा म्हणून तो शिक्षणासोबतच नऊ महिन्यांपूर्वी अंधेरीच्या एका कंपनीत सेल्समनची नोकरी करत होता. दररोज रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास काम संपवून अंधेरीवरून विरारची लोकल पकडून येत असे.

मयंकचे वडील रमेश लोहार यांनी अश्रूंना वाट मोकळी करून देत, “एका छोट्याशा कारणामुळे माझ्या मुलाचा जीव गेला. माझ्या म्हातारपणाचा आधार हिरावला गेला,” अशी हळहळ व्यक्त केली. माझा भाऊ २१ वर्षांचा होता. त्याला खूप मोठे व्हायचे होते. वडिलांना आर्थिक आधार देण्यासाठी तो कामाला जात होता. गर्दीच्या लोकलमध्ये माज्या भावाची निर्घृण हत्या झाली. आज माझा भाऊ गेला उद्या दुसऱ्याचा भाऊ जाऊ नये, अशा भावना मयंकची बहीण मेघा लोहार यांनी व्यक्त केल्या आहेत. शांत, सुस्वभावी आणि कष्टाळू मयंक होता. लोकलमध्ये हत्या होते ही किती गंभीर बाब आहे, असा संतप्त सवाल शेजारी प्रमोद पाटकर यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

Pune Water Cut : पुणे शहरात पाणी कपात अन तक्रारींचा पाऊस; नऊ दिवसात तब्बल १२०० तक्रारी

Wagholi Accident : रस्त्याच्या दुरवस्थेमुळे व्यापाऱ्याचा बळी; घसरून पडले, सेफ्टी टँकरच्या चाकाखाली आल्याने मृत्यू

​Kannad News : मुंगसापूरच्या बापु महाराजाच्या आश्रमावर FDA चा छापा; बोगस औषधविक्री संशयावरून कारवाई,'महाराज' हिमालयात गेल्याचा मॅनेजरचा दावा

SCROLL FOR NEXT