

Maharashtra Government Circular rakshabandhan holiday
esakal
Maharashtra Public Holiday : मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य सरकारी आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. गोपाळकाला (दहीहंडी) सणाची स्थानिक सुट्टी रद्द करून रक्षाबंधनला स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने शुद्धीपत्रक जारी केले आहे.