मध्य रेल्वेवर आणखी १२ एसी फेऱ्या
मुख्य मार्गावरील सेवा ८० वरून ९२ होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : वातानुकूलित (एसी) लोकलला प्रवाशांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन मध्य रेल्वेने आणखी १२ नव्या एसी फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच मध्य रेल्वेवरील एसी लोकल फेऱ्यांची संख्या १०८ वरून १२० पर्यंत पोहोचणार आहे. या सर्व नवीन फेऱ्या मुख्य मार्गावर चालविण्यात येणार आहेत.
सध्या मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर दररोज १०८ एसी लोकल फेऱ्या धावत असून, त्यामध्ये मुख्य मार्गावरील ८० फेऱ्यांचा समावेश आहे. नव्या १२ फेऱ्यांची भर पडल्याने मुख्य मार्गावरील एसी सेवांची संख्या ९२ वर जाणार आहे; मात्र हार्बर मार्गावरील एसी फेऱ्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एसी लोकलमधील प्रवासीसंख्या सातत्याने वाढत असून, मार्च आणि मे महिन्यात या सेवांना सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे अतिरिक्त फेऱ्यांची मागणीही वाढली होती. त्यानुसार प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वेने सांगितले.
---
साध्या लोकलना फटका?
अतिरिक्त एसी लोकल फेऱ्या नव्याने चालविण्याऐवजी विद्यमान साध्या लोकल फेऱ्यांच्या जागी चालविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. त्यामुळे एसी सेवांचा विस्तार होत असला तरी सामान्य लोकल प्रवाशांमध्ये त्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
----
एसी फेऱ्यांचा विस्तार
मे २०२५ पूर्वी - ६६
मे २०२५ - ८०
जानेवारी २०२६ - ९४
मे २०२६ - १०८
जून २०२६ - १२०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.