मुंबई

विरारमध्ये पार्किंगच्या वादातून अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने हल्ला

CD

अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने हल्ला
नालासोपारा, ता. २४ (बातमीदार) ः विरार पूर्वेतील कारगिलनगर परिसरात वाहन पार्किंगच्या किरकोळ वादाने हिंसक वळण घेतले. शाब्दिक वादानंतर तीन तरुणांनी एका अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारगिलनगर येथील महाकाली अपार्टमेंटमध्ये राहणारा १५ वर्षीय शहीद रमजान शाह हा सुट्टीच्या दिवशी मनवेलपाडा रोडवरील सबवे परिसरात घड्याळे आणि चष्मे विकण्याचे काम करतो. सोमवारी रात्री कामावरून परतल्यानंतर तो आपली दुचाकी इमारतीखाली पार्क करत होता. या वेळी भुट्या, नयन आणि मयूर तेथे आले. वाहन पार्किंगवरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. वाद सुरू असताना भुट्याने शस्त्राने शहीदवर हल्ला केला. या हल्ल्यात शहीदच्या हाताला गंभीर दुखापत झाली. विरार पोलिसांनी भुट्या, नयन आणि मयूर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack Video: पत्नीवर पिटबुलचा हल्ला, वाचवायला गेलेल्या पतीलाही चावा; दीड मिनिटात २६ वेळा चावले, हातासह पायावर सर्जरीची वेळ

Dagdusheth Ganpati Temple: ‘दगडूशेठ गणपती ट्रस्ट’ला फरासखाना ठाण्याची जागा मिळणार, पुणे पोलिसांकडून गृह विभागाकडे प्रस्ताव सादर

'वचन दिले तू मला' मालिकेतून अभिनेत्याची एक्झिट; मिलिंद गवळींनी शेअर केली खास पोस्ट ,म्हणाले- खूप त्रास

Shravan Calendar 2026: कॅलेंडर कशाला उघडताय? श्रावणातल्या सगळ्या सणांची यादी इथेच वाचा

Latest Marathi News Live Update : २०१८ च्या भागामध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही - सरन्यायाधीश

SCROLL FOR NEXT