मुंबई

धारदार शस्त्रे लोकलमध्ये येतात तरी कशी? आणखी किती बळी गेल्यावर रेल्वेला जाग येणार?

CD

धारदार शस्त्रे लोकलमध्ये येतात कशी?
आणखी किती बळींची प्रशासनाला प्रतीक्षा
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ :   काही महिन्यांपूर्वी दरवाजाजवळ उभे राहण्याच्या किरकोळ वादातून एका प्राध्यापकाची हत्या झाली होती. आता कांदिवली-बोरिवलीदरम्यान धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वादातून झालेल्या चाकूहल्ल्यात २२ वर्षीय मयंक लोहार याचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर लोकलमध्ये धारदार शस्त्र येतात तरी कशी, असा सवाल उपस्थित होत आहे.
अनेक लोकलमध्ये रात्रीच्या वेळी आरपीएफ किंवा जीआरपीचा मागमूसही दिसत नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे. चोरी, महिलांची छेडछाड, हाणामाऱ्या आणि आता खुनाच्या घटनाही घडत असताना सुरक्षा यंत्रणा नेमकी काय करते, असा सवाल होतो. कल्याण यार्डमध्ये एका तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणातून सुरक्षेचे प्रश्न उपस्थित झाले होते. धावत्या लोकलमधील किरकोळ वाद थेट खुनापर्यंत पोहोचत असतील, तर लाखो प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची, अशी विचारणा प्रवासी करीत आहे.
----
तपासणी व्यवस्था का नाही?
मेट्रो स्थानकांवर सुरक्षा रक्षक असतात. तिथे स्कॅनरद्वारे बॅगांची तपासणी होते; मात्र दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या लोकलमध्ये कोणतीही प्रभावी तपासणी व्यवस्था नाही. परिणामी धारदार शस्त्रे घेऊन लोक बिनधास्त प्रवास करतात. प्रवासीसंख्येमुळे हे करणे अशक्य असल्याचा युक्तिवाद चुकीचा आहे. धावत्या लोकलमध्ये खून करण्याचे धाडस गुन्हेगारांना होत असेल, तर रेल्वेच्या सुरक्षेवर कोण विश्वास ठेवेल, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
----
घटना घडल्यावरच जाग!
वाढती गर्दी, लोकलचा विलंब, प्रवाशांमधील तणाव आणि अपुऱ्या सुरक्षेमुळे लोकल प्रवास दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. प्राध्यापकाच्या हत्येनंतरही धडा न घेतलेल्या व्यवस्थेला आणखी किती प्रवाशांच्या मृत्यूची वाट पाहायची आहे, असा सवाल प्रवासी संघटनांनी विचारला.
---
सुरक्षेची जबाबदारी कोणाची?
दररोज लाखो प्रवासी तिकीट आणि पास काढून रेल्वेच्या सेवेसाठी पैसे मोजतात. त्यामुळे त्यांच्या जीविताच्या सुरक्षेची जबाबदारीही रेल्वे प्रशासनाचीच आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर केवळ घटना घडल्यानंतर हालचाल करण्याऐवजी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. 
-------
रेल्वेचे बजेट वाढले, जाहिराती वाढल्या; पण प्रवाशांची सुरक्षा मात्र आजही वाऱ्यावरच आहे. धावत्या लोकलमध्ये हत्या होत असेल, तर सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होतात.
 - ॲड. वर्षा गायकवाड, खासदार
----
विमानतळ आणि मेट्रोप्रमाणेच लोकल ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे, मग लोकलमध्ये प्रतिबंधित वस्तूंची तपासणी का होत नाही?  
- समीर झवेरी, सामाजिक कार्यकर्ते
----
प्रवाशांची संख्या जास्त असल्याचे कारण पुढे करून रेल्वे प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत धोरण राबविण्याची गरज आहे.
- लता अरगडे, अध्यक्ष, उपनगरीय प्रवासी संघटना
...............
पूर्वी काही महत्त्वाच्या स्थानकांवर स्कॅनर यंत्रणा कार्यरत होती. गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर सर्व स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे.
- वंदना सोनावणे, अध्यक्ष, महाराष्ट्र महिला प्रवासी संघटना
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Electricity: येत्या दोन वर्षांत गुजरातपेक्षाही स्वस्त वीज: मुख्यमंत्री फडणवीस, २०२९-३० पर्यंत महाराष्ट्र अव्वल ठरणार

FIFA World Cup: पुढचा प्रश्न घ्या... रोनाल्डोची मेस्सी, एम्बापेशी तुलना करणाऱ्या प्रश्नावर चिडचिड

Ketan Agrawal Murder Case : सिया लग्न मोडून प्रियकरासोबत पळून का गेली नाही? चेतनने पोलीस तपासात सांगितले धक्कादायक सत्य

२ वर्षांच्या चिमुकल्याला २५ वेळा चावा, २० मिनिटं मारहाण, एकाने केल्या उलट्या; प्ले स्कूलमधील संतापजनक प्रकार

Latest Marathi News Live Update : संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना लिहिले पत्र

SCROLL FOR NEXT