मुंबई

कांजूरमार्ग कचराभूमी प्रकरण :

CD

दुर्गंधी नियंत्रणाच्या उपाययोजनांची पडताळणी करा
पालिका, कचराभूमी परिचालकांसह ‘एमपीसीबी’ला आदेश
मुंबई, ता. २४ : कांजूरमार्ग कचराभूमीतील दुर्गंधी आणि प्रदूषणाच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेश बुधवारी (ता. २४) उच्च न्यायालयाने मुंबई महापलिकेसह कचराभूमी देखरेख करणाऱ्या परिचालकांना दिले. त्याचवेळी या उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली की नाही, त्याचे अपेक्षित परिणाम दिसतात का याबाबतची खातरजमा करण्याचे आदेश न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरती साठे यांच्या खंडपीठाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) दिले.
कचराभूमीमुळे होणाऱ्या दुर्गंधीच्या तक्रारी कमी झाल्या आहेत आहे का, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावर तक्रारींमध्ये लक्षणीय घट झाली असून जादा धूळ नियंत्रण फवारणी बसवण्यासह प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती कचराभूमी परिचालकांच्या वतीने वकील साकेत मोने यांनी दिली. मात्र सर्व पर्यावरणीय सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.
----
तक्रारींचे निवारण होते का?
एमपीसीबीला अनेक त्रुटी आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. नियमांचे पालन एमपीसीबी, पालिका आणि कंत्राटदार यांच्यापुरते मर्यादित न राहता नियमांचे पालन होत आहे का, दुर्गंधी व प्रदूषणाच्या तक्रारींचे प्रभावीपणे निवारण केले जात आहे का याबाबतची पडताळणी करावी, असेही खंडपीठाने नमूद केले.
----
पाच हजार रोपांची लागवड
कचराभूमी परिसरात आतापर्यंत ५ हजार २९ रोपे लावण्यात आली असून, आणखी १० हजार रोपे लावणार असल्याची माहिती पालिकेकडून न्यायालयाला देण्यात आली. या उपक्रमाचे कौतुक करताना या रोपांचे जतन आणि वाढ सुनिश्चित करणे हीच खरी कसोटी असेल, असे न्यायालयाने नमूद केले.
----
आणखी सुधारणेला वाव
दुर्गंधीच्या तक्रारी आणि प्रदूषणाची पातळी कमी झाली, तरीही सुधारणेला आणखी वाव आहे. कचराभूमीचे योग्य व्यवस्थापन व्हावे आणि स्थानिकांना दिलासा मिळावा, हेच उद्दिष्ट असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

SCROLL FOR NEXT