मुंबई

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या; भाजपचे लक्षवेधी आंदोलन

CD

दि. बा. पाटील यांचे नाव द्या; भाजपचे आंदोलन
नवी मुंबई, ता. २४ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे बुधवारी विमानतळ परिसरात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. या वेळी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करून नामकरणाच्या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव मिळावे, ही संपूर्ण रायगड आणि नवी मुंबई परिसरातील जनतेची भावना आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारला जनभावनेची आठवण करून देण्याचा आणि नामकरणाचा निर्णय लवकरात लवकर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या आंदोलनात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, लोकनेते दि. बा. पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेलचे महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत, पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे, उपसभापती भूपेंद्र पाटील यांच्यासह प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र, स्थानिक संघटनांचे प्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान उपस्थितांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी जोरदारपणे मांडली. शासनाने जनभावनेचा सन्मान करून विमानतळाच्या नामकरणाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१९ चौकार, ६ षटकार... Vaibhav Sooryavanshi चा भाऊही घालतोय धुमाकूळ! दीडशतक ठोकल्यानंतर भावाची स्पेशल पोस्ट

Mumbai AC Local : खुशखबर! 'मरे'वर आणखी १२ एसी लोकल फेऱ्या; एकूण संख्या १२० वर

Pune Water Cut : पुणे शहरात पाणी कपात अन तक्रारींचा पाऊस; नऊ दिवसात तब्बल १२०० तक्रारी

Wagholi Accident : रस्त्याच्या दुरवस्थेमुळे व्यापाऱ्याचा बळी; घसरून पडले, सेफ्टी टँकरच्या चाकाखाली आल्याने मृत्यू

​Kannad News : मुंगसापूरच्या बापु महाराजाच्या आश्रमावर FDA चा छापा; बोगस औषधविक्री संशयावरून कारवाई,'महाराज' हिमालयात गेल्याचा मॅनेजरचा दावा

SCROLL FOR NEXT