मुंबई

धोकादायक गॅलरी काढताना भिंत कोसळली; अरिहंत टॉवरमध्ये थरार सुदैवाने जीवितहानी नाही

CD

धोकादायक गॅलरी काढताना भिंत कोसळली
ठाणे, ता. २४ : नौपाडा परिसरातील ३० वर्षे जुन्या अरिहंत टॉवर इमारतीच्या धोकादायक गॅलरीचा भाग काढण्याचे काम सुरू असताना, अचानक गॅलरीची भिंत खालील मजल्यावरील गॅलरीत कोसळल्याची घटना बुधवारी घडली. यात गॅलरीच्या छतावरील पत्र्यांचे नुकसान झाले. मात्र, कोणतीही दुखापत झाली नाही. आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अरिहंत टॉवर इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील सदनिकेतील धोकादायक गॅलरी काढण्याचे काम सोसायटीमार्फत सुरू होते. या वेळी गॅलरीची भिंत कोसळून चौथ्या मजल्यावरील गॅलरीत पडली. त्यामुळे गॅलरीच्या छतावरील पत्रे तुटून नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, बांधकाम विभाग आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. संबंधित यंत्रणांनी तातडीने धोकादायक भाग हटवून परिसर सुरक्षित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेत खळबळ! 26 बंडखोर खासदारांच्या भवितव्यावर सभापती घेणार निर्णय, दोन-तृतीयांश बहुमत असूनही खासदारकी धोक्यात?

Latest Marathi News Live Update : येत्या दोन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता; 'आयएमडी’चा इशारा

Junnar Historical: जुन्नरमध्ये मोठा ऐतिहासिक शोध; सुसरबाग परिसरात २२०० वर्षांपूर्वीचे सातवाहनकालीन अवशेष, प्राचीन मणी सापडले

Tukaram Mundhe: आश्रमात औषध विक्री, तुकाराम मुंढेंच्या आदेशावरून मुख्य इमारत सील; महाराज CA, पण वैद्यकीय डीग्री नाही

Kagal Child Death : हृदयद्रावक! नारळाचे झाड घरावर कोसळून झोपलेला लहान मुलगा ठार; छताचा पत्रा फाटून ओंडका पडला अंगावर, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT