मुंबई

महसूल विभागानेच शेत खाल्ले!

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : वीटभट्टीसाठी उत्खनन केलेल्या मातीची रॉयल्टी व दंडाची रक्कम कमी करून देण्याच्या मोबदल्यात ५५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी तलाठी आणि पोलिस पाटलाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. मुरबाड येथील तलाठी मिलिंद महादेव शिंदे आणि पोलिस पाटील कुंडलिक पांडुरंग दमाने अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

तक्रारदार वीटभट्टी व्यावसायिक असून, त्यांनी माती उत्खनन केले होते. या मातीची रॉयल्टी भरली नसल्याने तहसीलदारांकडे अहवाल जाणार असल्याचे सांगून तलाठी शिंदे यांनी दंडासह दीड ते दोन लाख रुपये भरावे लागतील, असे सांगितले; मात्र पंचनाम्यातील मातीचे प्रमाण कमी दाखवून रॉयल्टी व दंड कमी करून देण्यासाठी ५० हजार रुपये मागितले. तसेच बेकायदा वीटभट्टी सुरू ठेवण्यासाठी पाच हजार रुपये, अशी एकूण ५५ हजारांची मागणी केल्याचे एसीबीच्या पडताळणीत निष्पन्न झाले.
पंचनाम्यात १०० ब्रासऐवजी ५० ब्रास माती दाखविण्याचे आश्वासन देत पहिला हप्ता म्हणून २० हजार रुपये घेण्याचे मान्य केले होते. पोलिस पाटील दमाने यांनी मध्यस्थी केल्याचेही समोर आले. याप्रकरणी मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक संतोष नावलगी यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati News : अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवारांसह बारामतीतील भगिनीही भावुक....

Viral Video: स्टंपची अदलाबदल केली राव, तरी विकेट काही मिळेना! ध्रुव जुरेलचा भन्नाट जुगाड; VIDEO तुफान व्हायरल

शाळेत पाठवण्याऐवजी बारमध्ये नेलं, ग्राहकांसोबत अश्लील हावभाव करायला सांगितलं अन्...; अल्पवयीन मुलीसोबत आत्याचं अमानुष कृत्य

१९ दिवसांपूर्वी लग्न, पती रक्षाबंधनला पत्नीला माहेरी सोडायला निघाला; मिठाई आणायला गेला अन्... नववधू प्रियकरासोबत फरार

Marathi News Live Updates : नागपुरात कंत्राटदारांचा संताप

SCROLL FOR NEXT