अंबरनाथ, ता. २८ (वार्ताहर) : पोलिसांमध्ये मोठी ओळख असल्याचा धाक दाखवत आणि भविष्यातील पोलिस कारवाईपासून वाचविण्याच्या भूलथापा देत ज्वेलर्स व्यापाऱ्याकडून चार लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक केली.
उत्तम कुमार छोगालाल प्रजापती (वय ४२) यांच्या तक्रारीनुसार, संजय प्रसाद आणि तेजस सरवदे या दोघांनी अंबरनाथ पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी आपली चांगली ओळख असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. भविष्यात तुमच्याविरोधात कोणतीही तक्रार आल्यास ती पोलिसांपर्यंत पोहोचू देणार नाही, तसेच पोलिसांकडून कोणतीही कारवाई होणार नाही. त्यासाठी सुरुवातीला पाच लाखांची मागणी करण्यात आली.
पोलिस कारवाईची भीती आणि ‘पँथर्स सेना’च्या नावाचा धाक दाखवत अखेर ज्वेलर्स व्यापाऱ्याकडून चार लाख रुपये घेतल्याची तक्रार आहे. तक्रारीनुसार, संशयितांनी मार्चमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रक्कम स्वीकारली. या दोघांनी फॉरेस्ट नाका परिसरातील एका पानटपरी चालकाकडूनही सात हजार रुपये उकळले. या प्रकारामुळे घाबरलेल्या टपरी चालकाने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
विकसकालाही गंडा
या दोघांविरोधात यापूर्वीही शहरातील एका विकसकांकडून दोन लाखांची खंडणी घेतल्याचा आरोप असून, त्या संदर्भात जुलैमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्वेलर्स व्यापाऱ्याच्या तक्रारीनंतर अंबरनाथ पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.