मुंबई

नागरी सुविधा प्रस्तावांना मंजुरी

CD

नागरी सुविधा प्रस्तावांना मंजुरी
नवी मुंबई महापालिका सर्वसाधारण सभेत रस्ते, गटारे, पदपथांसह सुरक्षाविषयक कामांना हिरवा कंदील
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २८ : नवी मुंबई शहरातील विविध विभागांतील रस्ते, पावसाळी गटारे, पदपथ सुधारणा आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अनेक प्रस्तावांना महापालिकेच्या ऑगस्ट महिन्याच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. महापौर सुजाता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने सभागृह नेते सागर नाईक यांनी हे विविध नागरी सुविधांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले होते. या निर्णयामुळे शहरातील अनेक भागांतील सांडपाणी, रस्ते दुरुस्ती आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
करावे येथील बाळशेठ तांडेल उद्यानालगतच्या साईवाडी भागात पावसाळी गटाराची पातळी सखल असल्याने मुसळधार पावसात बैठ्या घरांमध्ये पाणी शिरत होते. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून येथे नवीन आरसीसी गटार बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पावणे गावातील राजू गुप्ता हाऊस ते गरीब नवाज चिकन शॉप परिसरातील अरुंद गटारामुळे साचणारे पाणी, डासांचा प्रादुर्भाव आणि आरोग्याचा प्रश्न विचारात घेऊन येथे १,०५३ मीटर लांबीचे आणि १.१ मीटर रुंदीचे आरसीसी गटार बांधले जाणार आहे. सानपाड्यातील गोरबंध सोसायटी ते कोयना सोसायटीदरम्यान मोडकळीस आलेली ड्रेनेज लाईन बदलून त्या ठिकाणी हेवी ड्युटी एसडब्ल्यू ड्रेन बांधण्यात येणार आहे. यामुळे दुर्गंधी आणि अनारोग्याचा त्रास संपणार आहे. नादुरुस्त पावसाळी गटाराची पुनर्बांधणी करण्यासोबतच रस्त्याची रुंदी वाढवून पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या सर्व लोकोपयोगी विकासकामांना मंजुरी मिळाल्यामुळे नवी मुंबईतील स्थानिक रहिवासी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्यांचे निवारण जलद गतीने होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
चौकट
वाहतूक सुधारणा आणि रस्ते डांबरीकरण
नेरूळ सेक्टर २१ : शंकराचार्य उद्यानामागून जाणाऱ्या रिंग रोड व रेडियल रोडवरील सखल भागात साचणाऱ्या पाण्यामुळे खराब झालेल्या रस्त्याचे डांबरीकरणाद्वारे रुंदीकरण व सुधारणा केली जाईल.
तुर्भे टीटीसी एमआयडीसी : विविध सेवा वाहिन्यांसाठी खोदण्यात आलेल्या चरांचे पूर्ववत डांबरीकरण करून रस्ते पुनर्पृष्ठीकरणाच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
चौकट
नागरिकांची सुरक्षा आणि आरोग्य उपाययोजना
सानपाडा सेक्टर ०१ (रेल्वे हद्द फेन्सिंग) : शिवालय कॉम्प्लेक्स ते यशवंत टॉवरदरम्यानच्या नादुरुस्त पदपथाचे स्टॅम्प काँक्रीटीकरण केले जाईल. तसेच रेल्वे आणि नमुंमपा हद्दीदरम्यान कचरा-डेब्रिज टाकणे, अपघाती रेल्वे क्रॉसिंग आणि चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी ७३० मीटर लांबीचे ‘चेन लिंक फेन्सिंग’ (संरक्षक कुंपण) उभारण्यात येणार आहे.
सारसोळे गाव (ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्र. १२) : शाळेची पडझड झालेली संरक्षक भिंत दुरुस्त करून पदपथ सुधारणा व परिसर सुशोभीकरण केले जाईल. यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सुटेल.
भटक्या कुत्र्यांसाठी निवारा शेड पोचरस्ता : नेरूळ येथील सिडकोच्या दगड खाणीच्या भूखंडावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भटक्या कुत्र्यांसाठी निवारा शेड प्रस्तावित आहे. या डोंगराळ भागात पोहोचण्यासाठी भूभराव करून डब्ल्यूबीएम पोचरस्ता तयार करण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Bajpayee: अभिनेता मनोज वाजपेयीने मुळशीत घेतली 4.45 एकर जमीन; किंमत ऐकून बसेल धक्का

Marathi Movie Issue : मराठी चित्रपटाची महाराष्ट्रातच गळचेपी! ‘समर्थ’ चित्रपटासाठी स्क्रीनची वानवा; अन्य भाषिक चित्रपटांना प्राधान्य

MRP पेक्षा 400 रुपयांनी महाग विकली ब्रा! महिलेची थेट कोर्टात धाव; न्यायाधीश म्हणाले, ‘माणसं खोटं बोलू शकतात, पण...

Pune News : २३ आराखड्यांनंतर आता पुन्हा वाहतुकीचा नवा आराखडा

शाळेत पाठवण्याऐवजी बारमध्ये नेलं, ग्राहकांसोबत अश्लील हावभाव करायला सांगितलं अन्...; अल्पवयीन मुलीसोबत आत्याचं अमानुष कृत्य

SCROLL FOR NEXT