मुंबई

आगीने संसार उद्ध्वस्त, मदतीने मिळाला आधार

CD

आगीने संसार उद्ध्वस्त, मदतीने मिळाला आधार
ऐरोलीतील सोनवणे कुटुंबावर संकट; जखमी तिघांवर रुग्णालयात उपचार
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २८ : एका क्षणात कष्टाने उभा केलेला संसार आगीत भस्मसात होण्याची भीषण प्रसंग ऐरोलीतील सोनवणे कुटुंबावर ओढवला. घराला अचानक लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य खाक झाले. या दुर्घटनेत कुटुंबातील रोहन सोनवणे ८१ टक्के, तर त्यांची आई सुनीता सोनवणे ५१ टक्के भाजल्या आहेत. त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या शेजारी सारिका कांबळे यादेखील २५ टक्के भाजल्या. तिघांवर सध्या बर्न रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घरातील सर्व साहित्य आगीत नष्ट झाल्याने कुटुंबासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या परिस्थितीची माहिती मिळताच शिवसेना बेलापूर विधानसभा जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी तातडीने मदतीसाठी पुढाकार घेतला. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि ठाणे लोकसभा खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सोनवणे कुटुंबाला आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.
आगीने घर उद्ध्वस्त केले असले तरी या कठीण प्रसंगी समाजातून मिळणारा आधार कुटुंबासाठी मोठा दिलासा ठरत आहे. संकटातून सावरत पुन्हा उभे राहण्यासाठी सोनवणे कुटुंबाला या मदतीमुळे नवी उमेद मिळाली आहे.

पुन्हा आशेचा किरण
केवळ पोकळ सहानुभूती न दाखवता प्रत्यक्ष कृती करीत या कुटुंबाला नव्याने संसार उभा करून देण्यासाठी नगरसेवक किशोर पाटकर यांनी आवश्यक गृहपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. टीव्ही, फ्रिज, कपाट, स्वयंपाकाची भांडी, घरातील दैनंदिन वस्तू आणि महिन्याचा पूर्ण किराणा माल सुपूर्द करण्यात आला. यासोबतच रुग्णालयातील औषधोपचाराचा भार हलका व्हावा म्हणून माजी नगरसेविका वैशाली पाटील व रवींद्र पाटील यांच्याकडून आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Bajpayee: अभिनेता मनोज वाजपेयीने मुळशीत घेतली 4.45 एकर जमीन; किंमत ऐकून बसेल धक्का

Marathi Movie Issue : मराठी चित्रपटाची महाराष्ट्रातच गळचेपी! ‘समर्थ’ चित्रपटासाठी स्क्रीनची वानवा; अन्य भाषिक चित्रपटांना प्राधान्य

MRP पेक्षा 400 रुपयांनी महाग विकली ब्रा! महिलेची थेट कोर्टात धाव; न्यायाधीश म्हणाले, ‘माणसं खोटं बोलू शकतात, पण...

Pune News : २३ आराखड्यांनंतर आता पुन्हा वाहतुकीचा नवा आराखडा

शाळेत पाठवण्याऐवजी बारमध्ये नेलं, ग्राहकांसोबत अश्लील हावभाव करायला सांगितलं अन्...; अल्पवयीन मुलीसोबत आत्याचं अमानुष कृत्य

SCROLL FOR NEXT