मुंबई

महापालिकेच्या ‘स्मार्ट’ शाळांची खासगी शिक्षणावर मात

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २८ : खासगी शाळांचे वर्षागणिक वाढणारे अवाढव्य शुल्क आणि डोनेशनच्या त्रासाला कंटाळलेल्या पालकांसाठी नवी मुंबई महापालिकेच्या शाळा आता विश्वासार्ह पर्याय ठरत आहेत. महापालिकेने शिक्षण क्षेत्रात राबवलेल्या ‘स्मार्ट’ उपक्रमांमुळे आणि आधुनिक शिक्षण पद्धतीमुळे पटसंख्येने नवीन उच्चांक गाठला आहे. काही वर्षांपूर्वी २६ हजार ते ३५ हजार विद्यार्थी महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेत होते. आता ही संख्या सुमारे ४० ते ४५ टक्क्यांनी लक्षणीय वाढत पटसंख्या ५० हजारांवर पोहोचली आहे.

पालिकेच्या ५७ प्राथमिक आणि २३ माध्यमिक अशा एकूण ८० शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक युगाशी जोडणारे शिक्षण दिले जात आहे. दरवर्षी खासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कात होणारी वाढ मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य पालकांच्या आवाक्याबाहेर जात आहे. या पार्श्वभूमीवर पालिका शाळांमधील सुधारलेला शैक्षणिक दर्जा, सुसज्ज इमारती आणि प्रशिक्षित शिक्षकांमुळे पालकांचा दृष्टिकोन बदलला आहे. परिणामी, गेल्या काही शैक्षणिक वर्षांत शेकडो विद्यार्थ्यांनी खासगी शाळा सोडून पालिका शाळांमध्ये प्रवेश घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

विशेष प्रयोगशाळेमुळे शिक्षण रंजक
नवी मुंबई महापालिकेच्या शाळा आता केवळ पुस्तकी ज्ञानापुरत्या मर्यादित राहिल्या नसून विद्यार्थ्यांना आधुनिक युगाशी जोडणारे शिक्षण दिले जात आहे. प्रत्येक वर्गात संवादात्मक स्मार्ट बोर्ड आणि डिजिटल साहित्याद्वारे रंजक पद्धतीने अध्यापन केले जात आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांची प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यासाठी विशेष प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत.

दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दिलासा
पालकांची वाढती मागणी लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेल्या सेमी-इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमाच्या वर्गांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, बस प्रवास सवलत आणि शैक्षणिक साहित्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price: रक्षाबंधनाच्या तोंडावर साखरेचे दर घसरले! किरकोळ बाजारातही मिळणार फायदा; सरकारच्या नव्या कोटा पद्धतीचा काय परिणाम होणार?

Bolero Bike Accident : टुणकी-लाडणापूर मार्गावर भीषण अपघात; दीड वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाने बोलेरो पेटवली

Pune Traffic Update: पुण्यातील 'ट्रॅफिक'बाबत मोठी अपडेट! शहरातील 'मिसिंग रोड'च्या कामांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Nepal Floods: नेपाळच्या महापुरात अजून किती भारतीय नागरिक बेपत्ता? MEA कडून मोठं अपडेट समोर; संपूर्ण आकडेवारी सांगितली!

Sonal Dinusha Story: रक्षाबंधन स्पेशल! बहिणीने उधार पैसे घेऊन दिली होती पहिली बॅट; आज त्याच भावाने भारताविरुद्ध गाजवलं नाव

SCROLL FOR NEXT