मेट्रो-४च्या रोलिंग स्टॉकला मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : वडाळा-कासारवडवली मुंबई मेट्रो-४ आणि ४ ‘अ’च्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीआरएमएस) जवळपास वर्षभरानंतर ‘एमएमआरडीए’ला रोलिंग स्टॉकसाठी (रूळ आणि इतर घटक) सुरक्षा मान्यता दिली आहे. त्यामुळे या चालू वर्षाच्या अखेरीस या मेट्रो मार्गाचा काही भाग सुरू केला जाऊ शकणार आहे.
मेट्रो-४ हा वडाळा ते कासारवडवलीदरम्यान ३२ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आहे, तर मेट्रो ४ अ हा कासारवडवली ते गायमुखदरम्यान २.८८ किमीचा विस्तार आहे. एकूण ३५ किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेपैकी पहिला टप्पा गायमुख ते कॅडबरी जंक्शन हा १० किलोमीटर लांबीचा सुरू करण्याचे नियोजन आहे. या टप्प्यात कॅडबरी जंक्शन, माजिवडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजीनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवनीवाडा आणि गायमुख ही १० स्थानके आहेत. या मार्गिकेच्या रोलिंग स्टाॅकला सुरक्षा मंजुरी मिळाल्याने आता मेट्रोचा पहिला टप्पा सुरू करणे शक्य होणार आहे. दरम्यान, या मार्गिकेसाठीचा घोडबंदर रोडवरील मोगरपाडा येथे पूर्ण डेपो तयार होईपर्यंत गायमुख स्थानकातच गाड्यांची देखभाल करण्याचे नियोजन आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.