मुंबई

शहापूरच्या मुंबई - नाशिक महामार्गावर दरोड्याचा

CD

मुंबई-नाशिक महामार्गावर ६१ लाखांची लूट
शहापूर पोलिसांकडून पाच जणांना अटक; इतरांच्या शोधासाठी पथके

शहापूर, ता. २८ (वार्ताहर) : मुंबई-नाशिक महामार्गावरील खर्डी गावात दरोड्याचा थरार उघडकीस आला आहे. सुरतमधून व्यापाऱ्याची रोकड मुंबईला घेऊन जाणाऱ्या दोघांना मध्यरात्री रस्त्यात अडवून ६१ लाख ५० हजार रुपये लुटण्यात आले. यामध्ये दोघे पोलिसांच्या वेशात होते. याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर या गुन्ह्यात आणखी सात ते आठ जणांचा समावेश असल्याने त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
तक्रारदार गोविंद हरगोविंदभाई पटेल (वय ४३, अलथान, जि. सुरत) हे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या के. पी. अंगाडीया कंपनीत वाहनचालक आहेत. ते २३ ऑगस्टला मालाडमधील एका कार्यालयात एक कोटी रुपयांची रोकड घेऊन साथीदार जिगरभाई पटेल यांच्यासोबत निघाले होते. खर्डी गावात मुंबई-नाशिक महामार्गावर तीन व्यक्तींनी वाहनाची काच ठोकून उघडण्यास सांगितले. क्राईम ब्रँचचे पोलिस असून तुमचे वाहन घेऊन पोलिस चौकीत चला, असे बोलून दरोडेखोर गाडीत घुसले. त्यांनी गाडीचा ताबा घेतला. गाडी मुंबईऐवजी नाशिककडे वळवली. तेथून पुन्हा गाडी मुंबईच्या दिशेने वळवून महामार्गावरील एका बंद हॉटेलजवळ थांबवून ६१ लाख ५० हजार रुपये घेऊन पोबारा केला. तक्रारदार गोविंद पटेल यांनी सांगितले, की दोन दरोडेखोर हे पोलिसांच्या वेशात होते.

पोलिस कर्मचारी अटकेत
या प्रकरणात पाच जणांना अटक केली असून यामध्ये एक पोलिस कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यात एकूण सात ते आठ जणांचा समावेश असल्याची माहिती शहापूरचे उपविभागीय पोलिस अधीक्षक विशाल नागरगोजे यांनी दिली. तपासावर परिणाम होण्याच्या शक्यतेने गुन्ह्यात अटक केलेल्यांची नावे देण्यास त्यांनी नकार दिला. तर लुटीची रक्कम आणि इतर फरार आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास कदम यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price: रक्षाबंधनाच्या तोंडावर साखरेचे दर घसरले! किरकोळ बाजारातही मिळणार फायदा; सरकारच्या नव्या कोटा पद्धतीचा काय परिणाम होणार?

Bolero Bike Accident : टुणकी-लाडणापूर मार्गावर भीषण अपघात; दीड वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाने बोलेरो पेटवली

Pune Traffic Update: पुण्यातील 'ट्रॅफिक'बाबत मोठी अपडेट! शहरातील 'मिसिंग रोड'च्या कामांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Nepal Floods: नेपाळच्या महापुरात अजून किती भारतीय नागरिक बेपत्ता? MEA कडून मोठं अपडेट समोर; संपूर्ण आकडेवारी सांगितली!

Sonal Dinusha Story: रक्षाबंधन स्पेशल! बहिणीने उधार पैसे घेऊन दिली होती पहिली बॅट; आज त्याच भावाने भारताविरुद्ध गाजवलं नाव

SCROLL FOR NEXT