मुंबई

पार्क केलेल्या ट्रकचे दोन टायर डिस्कसह चोरीला

CD

ट्रकचे दोन टायर डिस्कसह चोरीला
ठाणे, ता. २८ : साकेत परिसरात पार्क केलेल्या ट्रकचे दोन टायर लोखंडी डिस्कसह चोरीला गेले आहेत. राबोडी येथील चालक हरफान फारुख खान (वय ४५) यांनी याप्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. २५ ऑगस्टला सायंकाळी त्यांनी ट्रक साकेत येथील मंदिरासमोरील रस्त्यालगत पार्क केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रकजवळ गेल्यावर मागील डाव्या बाजूचे दोन टायर लोखंडी डिस्कसह गायब असल्याचे आढळले. चोरीला गेलेल्या टायरच्या लोखंडी डिस्कची किंमत ६० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

दोन चोरट्यांना रेल्वे पालिसांकडून अटक
​कल्याण, ता. २८ (बातमीदार) : मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या अडीच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या दोन सराईत चोरांना कल्याण रेल्वे लोहमार्ग पोलिसांच्या गुन्हे शाखेने २४ तासांत अटक केली. कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल होते. ​पहिल्या गुन्ह्यात फिर्यादी महिला सुरत येथून इंदूर-खडकी स्पेशल एक्स्प्रेसने प्रवास करून गुरुवारी (ता. २७) कल्याण रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सहावर उतरत असताना, चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली होती. दुसऱ्या घटनेत, एक महिला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून एलटीटी-एसएमव्हीबी एक्स्प्रेसने प्रवास करून कल्याण रेल्वे स्थानकात आल्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरीला गेली होती. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे दीपक चौहान (वय २०) आणि सनीदेवल भोला चंद्रभान चौहान (२३) या दोन संशयितांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडे १७.५३ ग्रॅम वजनाच्या व दोन लाख ४५ हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या चेन मिळल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: महापुराने संपूर्ण शहर वाहून नेलं, पण संकटाची चाहूल आधीच होती; नेपाळला दिलेला इशारा का दुर्लक्षित झाला?

Marathi News Live Updates : गंडक नदीची पाणीपातळी सामान्य मर्यादेत

राखीच्या धाग्याने बांधलं आपुलकीचं नातं; डोंबिवलीत हजारो भगिनींसोबत रविंद्र चव्हाण यांचा रक्षाबंधन सोहळा

Imran Khan: ‘वडिलांची परिस्थिती खूपच खराब...’; इम्रान खान यांच्या मुलांनी सांगितलं तुरुंगातील वास्तव, प्रकृतीबाबत केले गंभीर दावे

Mahurgad News : नारळी पौर्णिमेला माहूरगडावर भक्तीचा महापूर; २५ किलोमीटरच्या पंचक्रोशी परिक्रमेत लाखो भाविकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT