मुंबई

ढोलकीसम्राट ज्ञानेश्वर ढोरे बुवा यांचे निधन

CD

ढोलकीसम्राट ज्ञानेश्वर ढोरे बुवा यांचे निधन

मुंबई, ता. २८ : महाराष्ट्राच्या लोककला आणि तालवाद्य क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत, उत्कृष्ट तालवाद्य वादक आणि ढोलकीपटू ज्ञानेश्वर भिकाजी ढोरे बुवा यांचे वयाच्या ७१व्या वर्षी निधन झाले. काळाचौकी येथील अभ्युदयनगरमधील राहत्या घरी त्यांनी शुक्रवारी (ता. २८) सकाळी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांना प्रचंड ताप होता. त्यातच श्वास घेण्यास त्रास होऊन कफ वाढल्याने त्यांची प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर परळ येथील भोईवाडा स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘व्वा रे पठ्ठ्या’ या गौरवपूर्ण शब्दाने महाराष्ट्राच्या लोककला क्षेत्रात ओळख निर्माण करणारे ज्ञानेश्वर ढोरे बुवा हे महाराष्ट्राचे लाडके ढोलकीसम्राट म्हणून प्रसिद्ध होते. गिरणगावात जन्मलेल्या ढोरे बुवांच्या घरातच कलेचे संस्कार झाले. त्यांच्या वडिलांचे स्वतःचे भजनी मंडळ होते. त्यामुळे लहानपणापासूनच मनोरंजन, प्रबोधन आणि उद्बोधनाच्या लोककलांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. ‘वस्त्रहरण’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘गाढवाचं लग्न’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘होनाजी बाळा’, ‘बावनखणी’ अशा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांना महाराष्ट्रातील नामवंत कलावंतांसोबत काम करण्याची संधी मिळाली. शाहीर साबळे, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, उत्तरा केळकर, अरुण सरनाईक, राम नगरकर, अशोक हांडे, मधु कांबीकर, ज्योती चांदेकर, माया जाधव यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या सहवासात त्यांच्या कलेला अधिक व्यापक व्यासपीठ मिळाले. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारताबाहेरही त्यांच्या ढोलकीचा नाद पोहोचला. मॉरिशस, पॅरिस यांसह विविध देशांमध्ये त्यांनी आपल्या ढोलकीवादनाने रसिकांची दाद मिळवली. ‘स्वर साक्षीदार ज्ञानेश्वर’ अशी स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची क्षमता त्यांच्या कलेत होती. साधा वारकरी पेहराव आणि ‘बुवा’ ही ओळख त्यांनी शेवटपर्यंत जपली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 5th T20: भारत-वेस्ट इंडिजचा अंतिम टी-२० सामना कुठे अन् कधी पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या

Marathwada Graduates Constituency Election : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत रंगत! नेत्यांचे फोटो दोन्ही उमेदवारांच्या प्रचार बॅनरवर; मतदार संभ्रमात!

Parli Vaijnath News : आमदार धनंजय मुंडे यांनी परळीत देवीचे दर्शन घेतले, आपल्या हाताने खिचडी प्रसाद बनवला आणि भाविकांना वाटला ही....

Marathi News Live Updates: गोरेगावात काळीज पिळवटून टाकणारी घटना; १० वर्षांच्या मुलीने १८ महिन्यांच्या चिमुरडीला ६ व्या मजल्यावरून फेकले

Death Penalty: मेरठ कोर्टाचा ऐतिहासिक निकाल! पतीला साप चावल्याचा बनाव करणाऱ्या पत्नीसह प्रियकराला फाशीची शिक्षा

SCROLL FOR NEXT