मुंबई

मुदत संपल्यावर मराठीची परीक्षा द्यावीच लागणार’

CD

मुदत संपल्यावर परीक्षा द्यावीच लागणार
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : मुख्यमंत्र्यांनी मराठीची सक्ती रद्द केली नाही. त्यास केवळ मुदतवाढ दिली आहे. मुदत संपल्यानंतर मराठीची परीक्षा द्यावीच लागणार, असा इशारा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. दरवर्षीप्रमाणे संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून दहीहंडीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यासाठी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे स्पष्ट केले.
बाळासाहेबांनी आम्हाला मराठीचा अभिमान करायला शिकवले. त्याच भूमिकेतून अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकवण्याचे काम सुरूच राहणार आहे. यंदाची दहीहंडी केवळ उत्सव न राहता मराठीचा अभिमान बाळगणारा उत्सव ठरणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. विशेष म्हणजे यंदा अमराठी वाहनचालकही दहीहंडी उत्सवात सहभागी होऊन ‘मराठीचे थर’ लावणार आहेत. अशा सहभागी वाहनचालकांना विशेष बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
मी मंत्री झाल्यापासून मराठीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मराठी जगभर पोहोचावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत; मात्र कोणाचाही रोजगार हिरावून घेण्याचा आमचा उद्देश नसल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. तसेच मराठीसक्तीच्या मुदतवाढीवरून सुरू असलेल्या चर्चेला वेगळे वळण देण्याची गरज नसल्याचे सांगताना सरनाईक म्हणाले, की मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून निर्णय घेतला आहे. तो आम्हाला बंधनकारक आहे.

९३ हजार गोविंदांचा विमा
९३ हजार गोविंदांचा विमा काढण्यात आला असून, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येणार आहे. १० थरांचा विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकाला २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले.
………….

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTAच्या कारभारात मोठा बदल; IAS-IPS सह ३ अधिकाऱ्यांची नियुक्ती, ३ आठवड्यांत रुजू होण्याचे आदेश, केंद्राचा महत्त्वाचा निर्णय

Bangladeshi Infiltrators Arrested : पुण्यात तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक; विशेष शाखा व लष्करी गुप्तचर यंत्रणेची कारवाई

Nepal Flood Viral Video: नेपाळमधील महापुरात 'ते' एकच घर कसं अभेद्य राहिलं? पुढे काय झालं? सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

Nepal Flood: महापुराने संपूर्ण शहर वाहून नेलं, पण संकटाची चाहूल आधीच होती; नेपाळला दिलेला इशारा का दुर्लक्षित झाला?

राखीच्या धाग्याने बांधलं आपुलकीचं नातं; डोंबिवलीत हजारो भगिनींसोबत रविंद्र चव्हाण यांचा रक्षाबंधन सोहळा

SCROLL FOR NEXT