मुंबई

वैतरणा खाडीत रेती माफियांवर महसूल विभागाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

CD

वैतरणा खाडीत रेतीमाफियांवर कारवाई
लोखंडी बोट, सक्शन पंप जाळून नष्ट; तीन वाहने जप्त
मनोर, ता. २९ (बातमीदार) ः पालघर आणि वसई तालुक्याच्या सीमाभागात वैतरणा खाडीत सुरू असलेल्या अनधिकृत रेती उत्खननावर जिल्हा गौण खनिज भरारी पथकाने कारवाई केली. जिल्हा गौण खनिज विभागाचे नायब तहसीलदार तथा भरारी पथक प्रमुख चंद्रकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईत अनधिकृत रेतीउपसा करणारी लोखंडी बोट आणि सक्शन पंप जाळून नष्ट करण्यात आले. तसेच विनापरवाना रेती वाहतूक करणारे दोन ट्रक आणि दगड वाहतूक करणारा एक ट्रक जप्त करण्यात आला.
वैतरणा खाडी परिसरात अनधिकृत रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा गौण खनिज भरारी पथकाने सापळा रचला. खासगी बोटीतून वैतरणा खाडीपात्रात पोहोचून रेती उत्खनन करताना आढळलेली लोखंडी बोट आणि सक्शन पंप ताब्यात घेतले. पथकाने सक्शन पंप आणि बोटीला आग लावली. त्यानंतर लोखंडी बोट खाडीच्या पाण्यात बुडवून नष्ट करण्यात आली. या कारवाईमुळे रेती तस्करांच्या अवैध कारवायांना मोठा आळा बसणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, कारवाईवेळी विनापरवाना रेती वाहतूक करणारे दोन ट्रक आणि दगड वाहतूक करणारा एक ट्रक पथकाच्या हाती लागला. तिन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत. तीन ट्रक आणि रेती आणि दगड मिळून ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त कारण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCA च्या किचनला ८७ गुण, तरी FDAची कारवाई; हायकोर्टाने घेतला आक्षेप, ५ लायसन्सवरील निलंबन हटणार

Success Story: वय 16, कंपनीत 15 कर्मचारी अन् वडिलांनाच देतो 2 लाखांचा पगार! केरळच्या या ‘AI Kid’ची भन्नाट कहाणी

Ather Konark Electric Scooter Launch : एथर एनर्जीची ‘कोनार्क’ इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; 200 किमीपर्यंत रेंज, बॅटरीवर 10 वर्षांची वॉरंटी

MPSC Exam : कोणताही क्लास न लावता ऋषीकेश राज्यात पहीला; उद्योग निरीक्षक व दुय्यम अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्कपदी निवड

Mamata Banerjee: मोठी बातमी! ममता बॅनर्जींसह तृणमूल काँग्रेसच्या बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल; पोलिसांनी स्वतः घेतली दखल

SCROLL FOR NEXT