‘मेट्रो-७ अ’चा उन्नत मार्ग फनेल झोनच्या कचाट्यात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : दहिसरवरून मेट्रोने आलेल्या प्रवाशांना थेट विमानतळावर पोहोचता यावे, म्हणून ‘एमएमआरडीए’कडून उभारल्या जात असलेला मेट्रो-७ अ मार्ग फनेल झोनच्या कचाट्यात अडकला आहे. साडेतीन किलोमीटर लांबीच्या या मार्गापैकी सुमारे एक किमीच्या उन्नत मार्गाच्या ओव्हरहेड वायर (ओएचई) आणि एअरपोर्ट कॉलनी मेट्रो स्थानकाच्या छतामुळे हवाई सुरक्षेचे (फनेल झोन) उल्लंघन होत आहे. त्यामुळे वाढीव उंचीला एअरपोर्ट ॲथाॅरिटीकडून मंजुरी मिळेल की केलेल्या कामाची तोडफोड करावी लागेल, असे प्रश्न ‘एमएमआरडीए’समोर उभा राहिला आहे.
‘एमएमआरडीए’कडून गुंदवली मेट्रो स्थानक ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान मेट्रो-७ अ हा भुयारी आणि उन्नत मेट्रो मार्ग उभारला जात असून त्याचे सुमारे ८० टक्के काम झाले आहे.
दरम्यान, या प्रकल्पाच्या उन्नत मार्गाचा एअरपोर्ट काॅलनीचा टप्पा फनेल झोनमध्ये येत असल्याचे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर या अतिरिक्त उंचीच्या मंजुरीसाठी एमएमआरडीएकडून सध्या विमानतळ प्राधिकरणाकडे (एएआय) पाठपुरावा सुरू आहे. किती उंचीची परवानगी देता येईल आणि त्यानुसार प्रकल्पात काही बदल करावे लागतील का, याबाबत त्यांचा अंतिम तांत्रिक अहवाल आल्यानंतरच त्याचे सविस्तर तांत्रिक मूल्यमापन करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे मेट्रो प्रकल्प संचालक बसवराज एम. बी. यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एएआयने वाढीव उंचीबाबत सकारात्मक भूमिका न घेतल्यास प्रकल्पाच्या झालेल्या कामाची तोडफोड करावी लागेल, त्यामुळे प्रकल्पाचा ८१२ कोटी रुपयांचा खर्च सुमारे २५० कोटींनी वाढण्याची शक्यता आहे. तसेच प्रकल्प पूर्ण होण्याची डिसेंबर २०२६ असलेली मुदत पुढे जाण्याची भीती अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.