मुंबई

आठ वर्षांत ६८ अंतर्लिंगी नवजातांची नोंद

CD

आठ वर्षांत ६८ आंतरलिंगी नवजातांची नोंद
२०२४-२५ मध्ये २२ बाळांची नोंद; मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाची आकडेवारी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये २०१९ ते २०२५ या सात वर्षांच्या कालावधीत ६८ आंतरलिंगी नवजात बाळांच्या जन्माची नोंद झाली आहे. यापैकी गेल्या दोन वर्षांत म्हणजे २०२४ मध्ये १५ आणि २०२५मध्ये सात, अशा २२ नवजातांची नोंद झाली आहे. मात्र २०२२ आणि २०२३ या दोन वर्षांत एकाही आंतरलिंगी नवजात जन्माची नोंद उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे.
आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी मुंबई महापालिकेकडे आंतरलिंगी नवजात बाळांच्या जन्मासंदर्भातील वर्षनिहाय, २४ विभागनिहाय आणि धर्मनिहाय माहिती मागितली होती. त्यावर महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने उपलब्ध नोंदींच्या आधारे वर्षनिहाय आकडेवारी दिली आहे. मात्र २४ विभागनिहाय आणि धर्मनिहाय तपशील उपलब्ध करून देण्यात आलेला नाही.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये सर्वाधिक २१ आंतरलिंगी नवजातांच्या जन्माची नोंद झाली होती. त्यानंतर २०२० मध्ये १९ आणि २०२१ मध्ये सहा जन्म नोंदविण्यात आले. २०२२ आणि २०२३ मध्ये एकही नोंद नसली तरी २०२४ मध्ये पुन्हा १५ आणि २०२५ मध्ये सात अशा एकूण २२ नवजातांची नोंद झाली आहे.
दरम्यान, आंतरलिंगी ही जन्मजात जैविक स्थिती असून, गर्भाच्या वाढीदरम्यान लैंगिक विकासाच्या प्रक्रियेत विविध जैविक घटकांमुळे जननेंद्रियांची किंवा लैंगिक वैशिष्ट्यांची रचना नेहमीच्या स्त्री किंवा पुरुष वर्गीकरणापेक्षा वेगळी असू शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

गर्भाची वाढ होत असताना लैंगिक विकासाच्या प्रक्रियेत काही जैविक बदल झाल्यास बाळाच्या जननेंद्रियांची अथवा लैंगिक वैशिष्ट्यांची रचना नेहमीच्या पुरुष किंवा स्त्री वर्गीकरणापेक्षा वेगळी असू शकते. आंतरलिंगी असणे ही कोणाचीही चूक नसून, ती जन्मजात जैविक स्थिती आहे.
- डॉ. रजत कपूर, प्लास्टिक सर्जरी विभाग, जे. जे. रुग्णालय

आंतरलिंगी नवजात जन्मांची आकडेवारी
वर्ष नोंदविलेले जन्म
२०१९ २१
२०२० १९
२०२१ ६
२०२२ ०
२०२३ ०
२०२४ १५
२०२५ ७
एकूण ६८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Officer Reshuffle: मोठा प्रशासकीय फेरबदल! ५६ बीएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अनेक जिल्ह्यांमध्ये नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती

Divorce Maintenance : कर्मचाऱ्यांना झटका ! पत्नीला पोटगी दिली नाही तर थेट पगारातून कपात; सरकारचा मोठा निर्णय

Junnar Tourism : किल्ले शिवनेरीसह जुन्नर तालुक्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी; हॉटेल व्यवसाय, रोजगाराला चालना

Eknath Shinde Parbhani : परभणीत एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा अन्... नेमकं काय घडलं?

Bhimashankar Route: घोडेगाव-भीमाशंकर रस्ता खड्डेमय, अंगणवाडी पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जाची चौकशी करा : सुप्रिया सुळे

SCROLL FOR NEXT