मुंबई

नवीन बनवलेल्या रस्त्यावरच पडले मोठमोठे खड्डे

CD

नवीन बनवलेल्या रस्त्यावरच पडले मोठमोठे खड्डे
निकृष्ट कामाबाबत नागरिकांचा सवाल

मालाड, ता. ३० (बातमीदार) : मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरातील शहीद अब्दुल हमीद रस्त्यावर अवघ्या काही महिन्यांतच मोठमोठे खड्डे पडल्याने पालिकेच्या रस्ते विभागाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले होते; मात्र काही महिन्यांतच रस्त्यावरील डांबर उखडून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची गुणवत्ता आणि देखरेख याबाबत स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
रस्त्याचे काम सुरू असताना पालिकेच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योग्य प्रकारे पाहणी व निरीक्षण केले असते, तर इतक्या कमी कालावधीत रस्त्याची अशी दुरवस्था झाली नसती, अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे. तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे वेळेत बुजवले जात नसल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, छोट्या-मोठ्या प्रश्नांवर तत्परतेने आवाज उठविणारे राजकीय नेते आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष का करीत आहेत, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पालिकेने तातडीने खड्डे बुजवून रस्त्याची पाहणी करावी आणि रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divorce Maintenance : कर्मचाऱ्यांना झटका ! पत्नीला पोटगी दिली नाही तर थेट पगारातून कपात; सरकारचा मोठा निर्णय

Junnar Tourism : किल्ले शिवनेरीसह जुन्नर तालुक्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी; हॉटेल व्यवसाय, रोजगाराला चालना

Eknath Shinde Parbhani : परभणीत एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा अन्... नेमकं काय घडलं?

Bhimashankar Route: घोडेगाव-भीमाशंकर रस्ता खड्डेमय, अंगणवाडी पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जाची चौकशी करा : सुप्रिया सुळे

Marathi News Live Updates : नेपाळमधील दुर्घटनेत ७६८ जणांचा मृत्यू; ३,००० हून अधिक जण अजूनही बेपत्ता

SCROLL FOR NEXT