मुंबई

मुंबईकरांच्या ‘कटिंग’ला महागाईचा कट

CD

मुंबईकरांच्या ‘कटिंग’ला महागाईचा कट
साखर, दूध, गॅस आणि चहापत्तीच्या वाढत्या खर्चामुळे दरवाढीची शक्यता

नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : चहाच्या कपातील गोडवा वाढविणारी साखर आता मुंबईकरांच्या खिशाला चटका देण्याची शक्यता आहे. साखरेच्या दराचा उडालेला भडका तसेच म्हशीच्या दुधामागे प्रतिलिटर नऊ रुपयांची वाढ, यामुळे आधीच महागलेला मुंबईकरांचा फेव्हरेट कटिंग चहा अधिक महागण्याची शक्यता आहे.
काही आठवड्यांपूर्वी मुंबईतील किरकोळ बाजारात साखरेचा दर ४९ ते ५० रुपये प्रतिकिलोच्या आसपास होता. त्यानंतर तो वाढत वाढत ६० रुपयांनंतर ७५ ते ८० रुपयांपर्यंत पोहोचल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. सध्या साखरेचे दर कमी झाले असले तरी तुलनेत साखर अजूनही महाग आहे. त्यामुळे चहाविक्रेत्यांच्या दैनंदिन खर्चात वाढ झाली आहे.

गॅस, साखर आणि दुधाच्या महागाईची झळ
दुसरीकडे मुंबईत म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरात प्रतिलिटर नऊ रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे चहाचा खर्च अजून वाढणार आहे. चहापत्ती, पेपर कप आणि अन्य साहित्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे यापूर्वीच अनेक ठिकाणी १० रुपयांचा कटिंग चहा १३ रुपयांवर पोहोचला. साखर आणि दुधाच्या दरामुळे कटिंग चहाचे दर वाढवण्याच्या निर्णय लवकरच घ्यावा लागणार असल्याचे चहा विक्रेत्यांनी सांगितले.

छोट्या चहातही रुपयाची वाढ
काही ठिकाणी पाच रुपयांना मिळणारा छोटा चहा सहा रुपयांना विकला जात आहे; मात्र कटिंग चहाच्या दरात सध्या सर्वत्र वाढ झालेली नाही.

गॅस, दूध, साखर, चहापत्ती, पेपर कप आणि वाहतूक अशा सर्वच बाबींचा खर्च वाढला आहे. आता साखरचे दर वाढले आणि दूध महागणार असल्याने खर्च आणखी वाढत आहे. परिस्थिती अशीच राहिली, तर नाईलाजाने कटिंगचा दर वाढवावा लागेल.
- नरेश पाटीदार, मालक, श्री जनता टी

ग्राहकांना दरवाढ नको असते; मात्र दूध, साखर, चहापत्ती आणि अन्य साहित्याचा खर्च वाढत असल्याने जुना दर कायम ठेवणे कठीण होत आहे. साखर आणि दुधाचे दर पुढे कसे राहतात, हे पाहून पुढील निर्णय घ्यावा लागेल.
- भिवा डोमर, विक्रेते, ए वन टी अमृततुल्य

चहाप्रेमींचा खिशाला कट
कटिंग चहाच्या दरात एक रुपयाची वाढ झाल्यास दिवसाला दोन कटिंग घेणाऱ्या ग्राहकाला महिन्याला सुमारे ६० रुपये अधिक मोजावे लागतील. दररोज तीन कटिंग घेणाऱ्याचा महिन्याचा अतिरिक्त खर्च सुमारे ९० रुपये होईल. कपामागील एक रुपयाची वाढ किरकोळ वाटत असली, तरी नियमित ग्राहकांच्या मासिक खर्चावर त्याचा परिणाम होणार आहे.

- कटिंगचा पूर्वीचा दर : १० रुपये
- सध्याचा दर : १३ रुपये
- छोट्या चहाचा पूर्वीचा दर : ५ रुपये
- छोट्या चहाचा सध्याचा दर : ६ रुपये
- साखरेचा सध्याचा दर : सुमारे ५८ रुपये प्रतिकिलो
- म्हशीच्या दुधाचा घाऊक दर : १ सप्टेंबरपासून प्रतिलिटर नऊ रुपयांनी वाढणार
- पुढील काळात कटिंगच्या दरवाढीची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Sharma Death : राजकारणात खळबळ! भाजपच्या दिग्गज नेत्याने जीवन संपवलं; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi याला १९ वर्षांखालील भारतीय संघातून का केलं बाहेर? BCCI चा नियम काय सांगतो?

Skin Care: ड्रेसिंग टेबलवर वर्षांनुवर्षे पडलेला परफ्युम सुरक्षित आहे का? त्वचेसाठी ठरू शकतो घातक; 'हे' बदल दिसताच वापरणे करा बंद! 

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवापूर्वी पुणे पोलिसांचा मोठा आदेश; १४ दिवस कलम ३७ लागू, पाचपेक्षा अधिक जणांच्या जमावावर बंदी

द ग्रेट खलीच्या कारचा अपघात; अशी झाली अवस्था, व्हिडीओ शेअर करत सांगितलं काय घडलं

SCROLL FOR NEXT