मुंबई

पुस्तके परत न केल्याने वाचनालय बंद

CD

विरार, ता. ३० (बातमीदार) : बससाठी वाट बघणाऱ्या प्रवाशांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने नालासोपारा बस आगारात सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले होते; मात्र प्रवाशांनी वाचण्यासाठी नेलेली पुस्तके परत आणून न दिल्यामुळे आगारातील स्टँडवरील उरलेली पुस्तके बाजूला काढून ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे उद्घा‌टनाच्या अवघ्या पंधरा दिवसांतच सार्वजनिक वाचनालयाचा प्रकल्प गुंडाळला गेल्याचे चित्र दिसून येत आहे.

लांब पल्ल्याचा प्रवास करताना अनेकांना पुस्तक वाचण्याची सवय असते; मात्र अलीकडच्या धकाधकीच्या काळात वाचनालयात जाऊन पुस्तक घेणे, ते वेळेवर परत करणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाचन संस्कृती टिकवण्याच्या दृष्टीने नालासोपारा बस आगारात सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वातंत्र्यदिनी आमदार राजन नाईक यांच्या हस्ते या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घा‌टन करण्यात आले होते. या वेळी विविध विषयांवर आधारित तसेच प्रसिद्ध लेखकांची सुमारे ३० पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. उद्घाटनानंतर काही प्रवाशांनी आगारातील वाचनालयातील पुस्तकेही वाचण्यासाठी नेली होती; मात्र यापैकी अनेकांनी पुस्तके परत केली नाहीत.

सार्वजनिक वाचनालयाचा उपक्रम सुरू राहावा म्हणून पुस्तक नेणाऱ्या प्रवाशांची नोंद ठेवण्यासाठी तसेच या वाचनालयाची देखरेख करण्यासाठी व्यक्ती नियुक्त करून ते पुन्हा सुरू केले जाईल, अशी प्रतिक्रिया आगारप्रमुख नवनीत गावित यांनी दिली.

विरार : नालासोपारा बस आगारातील वाचनालय बंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेत शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर नवे निर्बंध! CPT इंटर्नशिप का आली अडचणीत? भारतीय विद्यार्थ्यांवरही परिणाम होणार?

Sunil Sharma Death : राजकारणात खळबळ! भाजपच्या दिग्गज नेत्याने जीवन संपवलं; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi याला १९ वर्षांखालील भारतीय संघातून का केलं बाहेर? BCCI चा नियम काय सांगतो?

Skin Care: ड्रेसिंग टेबलवर वर्षांनुवर्षे पडलेला परफ्युम सुरक्षित आहे का? त्वचेसाठी ठरू शकतो घातक; 'हे' बदल दिसताच वापरणे करा बंद! 

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवापूर्वी पुणे पोलिसांचा मोठा आदेश; १४ दिवस कलम ३७ लागू, पाचपेक्षा अधिक जणांच्या जमावावर बंदी

SCROLL FOR NEXT