मुंबई

नालासोपाऱ्यात ५५ मतदान केंद्रांची घट

CD

विरार, ता. ३० (बातमीदार) : पालघर मतदार विशेष फेरतपासणीच्या पहिल्या टप्प्यात पालघर लोकसभा क्षेत्रातील २३.७६ लाख मतदारांपैकी ७२ टक्के मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे. प्रगणक प्रपत्रांची वैधता न झाल्याने मतदान केंद्रांच्या निकषानुसार पालघर लोकसभा क्षेत्रातील ३१ मतदान केंद्रे कमी झाली असून, नालासोपारा विधानसभा क्षेत्रात तब्बल ५५ मतदान केंद्रे कमी झाली आहेत.

२०२४च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत विशेष फेरतपासणीदरम्यान मतदारसंख्येत एक लाख ८० हजारांची वाढ झाली असली, तरी नोंदणीकृत मतदारांपैकी नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील ५४ टक्के, बोईसरमधील ६६ टक्के आणि वसईमधील ७० टक्के मतदारांची प्रगणक प्रपत्रे डिजिटलीकृत झाली आहेत. विक्रमगड, डहाणू विधानसभा क्षेत्रांत ९० टक्क्यांहून अधिक मतदारांची निश्चिती प्रगणक प्रपत्रांवरून झाली आहे. सध्या दोन्ही विधानसभा क्षेत्रांतील मतदारसंख्येत लक्षणीय वाढ आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सुमारे १,३०० मतदारांची संख्या राखण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील ५५ मतदान केंद्रे कमी झाली आहेत. याउलट विक्रमगड विधानसभा क्षेत्रात १३, तर डहाणू विधानसभा क्षेत्रात १० मतदान केंद्रे वाढली आहेत. बोईसर, वसई विधानसभा क्षेत्रांतील मतदान केंद्रांच्या संख्येत सध्या कोणताही बदल नाही. पुढील आठवड्यात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मॅपिंग न झालेले तसेच तांत्रिक चुका असलेल्या मतदारांची सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतर मतदारसंख्या निश्चित होईल. त्यानुसार मतदान केंद्रांची पुनर्रचना केली जाण्याची शक्यता निवडणूक विभागाने व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Parbhani : परभणीत एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा अन्... नेमकं काय घडलं?

अमेरिकेत शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर नवे निर्बंध! CPT इंटर्नशिप का आली अडचणीत? भारतीय विद्यार्थ्यांवरही परिणाम होणार?

Pimpalvandi Minor Murder Case: पिंपळवंडीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार-हत्येप्रकरणी २ सप्टेंबरपर्यंत चार्जशीट; फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवण्याचा मंत्र्यांचा निर्धार

Relationship Numerology: 'या' मूलांकांच्या नणंद-भावजयीची जोडी असते सुपरहीट; पाहा अंकशास्त्रातील ३ सर्वात बेस्ट कॉम्बिनेशन्स!

Sunil Sharma Death : राजकारणात खळबळ! भाजपच्या दिग्गज नेत्याने जीवन संपवलं; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT