मुंबई

शहरी नक्षलवादप्रकरणी एनआयएला दणका

CD

शहरी नक्षलवादप्रकरणी एनआयएला दणका
वरवरा रावसह चौघांचा जामीन कायम

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : मुंबई प्रेस क्लबमधील कार्यक्रमाला उपस्थित राहून जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप वरवरा राव, सुधा भारद्वाज, व्हर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांच्यावर करण्यात आला होता. त्यांचा जामीन रद्द करण्याची एनआयएची मागणी विशेष सत्र न्यायालयाने नुकतीच फेटाळली. त्यामुळे चौघांचाही जामीन कायम राहिला.

जामीन मंजूर करताना या चौघांना एकमेकांच्या संपर्कात राहू नये, अशी अट न्यायालयाने घातली होती; मात्र जानेवारीमध्ये मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित एका कार्यक्रमाला चौघेही उपस्थित राहिल्याचे निदर्शनास आणून देत एनआयएने त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी केली होती. एनआयएने यासंदर्भात विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. प्रेस क्लबमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणे हे जामिनाच्या अटींचे उल्लंघन असल्याचा दावा तपास यंत्रणेने केला. दरम्यान, चारही आरोपींनी एनआयएच्या अर्जाला उत्तर देताना जामिनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप फेटाळला. प्रेस क्लबकडून निमंत्रण मिळाल्याने आपण कार्यक्रमाला उपस्थित राहिलो; मात्र या कार्यक्रमादरम्यान इतर आरोपींशी संपर्क साधण्याचा कोणताही प्रयत्न केला नसल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष सत्र न्यायालयाने एनआयएचा अर्ज फेटाळून लावत चौघांचा जामीन कायम ठेवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJPचे संस्थापक काही संत नाहीत...; अभिजीत दिपके-सौरभ दासांबद्दल सोनम वांगचुकांचा मोठा दावा, काय म्हणाले?

Sangola Politics: सांगोला राजकारणात ‘बापू-आबा’च्या कानगोष्टींनी खळबळ; नव्या राजकीय समीकरणाची चर्चा जोरात

MSEB Short Circuit: महावितरणच्या डीपीतील शॉर्टसर्किटने १२ एकर ऊस भस्मसात; २५ लाखांचे नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात

Pune Crime: प्रेमप्रकरणातील वादातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्या; प्रियकर अटकेत, खराडी पोलिसांत गुन्हा दाखल

North Cyprus Boat Accident : समुद्रात प्रवासी बोट उलटली; २७० जण बुडाल्याची भीती, दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT