भिवंडी, ता. ३० (वार्ताहर) : शौचालयातील सांडपाणी रस्त्यावर अथवा थेट सार्वजनिक गटारात सोडणाऱ्यांविरोधात भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. ऑगस्टमध्ये अशा प्रकारे सांडपाणी सोडणाऱ्या संबंधितांकडून तब्बल ३५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
महापालिका आयुक्त अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत शौचालय स्वच्छतेच्या कामाची देखरेख शौचालय विभागाचे मुख्य आरोग्य निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली केली जात आहे. प्रभाग समिती क्रमांक १ ते ५ अंतर्गत येणाऱ्या खासगी इमारती; तसेच सार्वजनिक शौचालयांमधील सांडपाणी रस्त्यावर किंवा सार्वजनिक गटारात सोडले जात असल्याचे आढळल्यास संबंधितांवर आरोग्य निरीक्षक आणि मुकादम यांच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जात आहे.
रस्त्यावर किंवा गटारात सांडपाणी सोडल्यामुळे दुर्गंधी, अस्वच्छता तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पालिकेने कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑगस्टमध्ये सांडपाणी रस्त्यावर अथवा सार्वजनिक गटारात सोडल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करून एकूण ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.