मुंबई

घणसोली निवारा केंद्रात गैरप्रकार

CD

घणसोली निवारा केंद्रात गैरप्रकार
पाहणीदरम्यान गांजा व दारूच्या बाटल्या आढळल्याचा दावा; चौकशीची मागणी

वाशी, ता. ३० (बातमीदार) : घणसोली सेक्टर चार, भूखंड क्रमांक २४० येथील नवी मुंबई महापालिकेच्या रात्री निवारा केंद्रात गांजा आणि दारूच्या बाटल्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर नगरसेवक सौरभ शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह केंद्राची पाहणी केली. या वेळी व्यवस्थापक राहुल वाडे यांच्या खोलीत संशयास्पद स्वरूपातील गांजा आणि दारूच्या बाटल्या आढळल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे महापालिकेच्या निवारा केंद्राच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संबंधित सोसायटीमधील रहिवाशांनी केंद्राच्या परिसरातून दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर अचानक पाहणी करण्यात आली. बेघर, ज्येष्ठ आणि गरजू नागरिकांना सुरक्षित निवारा देण्यासाठी असलेल्या केंद्रात अमली पदार्थ व मद्याशी संबंधित साहित्य आढळल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. केंद्रातील रहिवाशांना पुरेशा वैद्यकीय सुविधा, वेळेवर अन्न आणि योग्य आरोग्यसेवा मिळते का, याचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सीसीटीव्ही तपासण्याची मागणी
या प्रकरणाची महापालिका प्रशासनाने तातडीने चौकशी करावी. केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज, नोंदी आणि कर्मचाऱ्यांची माहिती तपासावी, तसेच व्यवस्थापकाची चौकशी करावी, अशी मागणी सौरभ शिंदे यांनी केली आहे. आढळलेल्या साहित्याबाबत पोलिसांकडून स्वतंत्र तपास करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Parbhani : परभणीत एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा अन्... नेमकं काय घडलं?

Bhimashankar Route: घोडेगाव-भीमाशंकर रस्ता खड्डेमय, अंगणवाडी पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जाची चौकशी करा : सुप्रिया सुळे

Marathi News Live Updates : उत्तर सायप्रसजवळ २७० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली

Manchar Civic Probe: मंचर नगरपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहारांवर चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती; ३० दिवसांत अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Onion Theft: पोंदेवाडीतील शेतकऱ्याच्या कांद्याच्या बराकीत चोरी; २५-३० पिशव्या लंपास, सुमारे ६० हजारांचे नुकसान

SCROLL FOR NEXT