‘एनटीपीसी’ची १६ लाख कोटींची गुंतवणूक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० ः विजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर नॅशनल थर्मल पाॅवर काॅर्पोरेशनने (एनटीपीसी) देशाची वीजनिर्मितीची स्थापित क्षमता वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार सध्या असलेली ८९ गिगावाॅटची वीजनिर्मिती क्षमता पुढील दहा वर्षांत म्हणजे २०३७ पर्यंत तब्बल २४४ गिगावाॅटपर्यंत वाढवण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यासाठी १६.८६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.
देशातील औद्योगिक वाढ, शहरीकरण, इलेक्ट्रिक वाहने आणि डेटा सेंटर्समुळे विजेची मागणी झपाट्याने वाढत असून २०३७ पर्यंत एकूण मागणी तब्बल ४५९ गिगावाॅटपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘एनटीपीसी’ने आपला वीजनिर्मिती विस्तार आराखडा तयार केला असल्याचे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गुरदीप सिंह यांनी सांगितले. त्यानुसार पुढील दहा वर्षांत त्यांची एकूण वीजनिर्मिती क्षमता तिपटीहून अधिक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विस्तार आराखड्याप्रमाणे २०३२ पर्यंत १४९ गिगावाॅट स्थापित क्षमतेचे लक्ष गाठले जाणार आहे, त्यामध्ये ६० गिगावाॅट हरित ऊर्जा असणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. दरम्यान, सध्या कंपनीकडून हरित ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार चालू वर्षी ९.६ गिगावाॅटच्या नवीन वीज प्रकल्पांची भर पडली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.