मुंबई

पदकांसाठी ‘जेन अल्फा’चा ठिय्या

CD

पदकांसाठी ‘जेन अल्फा’चा ठिय्या
तरुण स्पर्धकांची नाराजी; ठाणे वर्षा मॅरेथॉन आयोजनावर प्रश्नचिन्ह

ठाणे, ता. ३० ः ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पदके न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी थेट महापालिका अधिकाऱ्यांसमोर ठिय्या आंदोलन केले. तर दुसरीकडे शुल्क आकारूनही नाश्तापाणी दिले नाहीच, उलट विजेत्या स्पर्धकांना पदकही दिले नसल्याने स्पर्धकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ३० हजारांहून अधिक धावपटूंच्या सहभागाने भव्य स्वरूपात झालेल्या मॅरेथॉनच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदा ३२वी महापौर वर्षा मॅरेथॉन झाली. मॅरेथॉन सुरक्षित आणि शिस्तबद्धपणे पार पडावी, यासाठी महापालिका आणि पोलिस प्रशासनाने मोठी तयारी केली होती. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र नियोजनही करण्यात आले होते. मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धा पूर्ण केल्यानंतर पदक मिळेल, या अपेक्षेने विद्यार्थी आले होते; मात्र पदक न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा संताप झाला. संतापलेल्या जेन अल्फाने महापालिका अधिकाऱ्यांसमोरच ठिय्या देत पदकांची मागणी केली. त्यामुळे मॅरेथॉनच्या अंतिम टप्प्यात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मेडल... मेडल... अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. अखेर मेडल आणि प्रमाणपत्र शाळेत दिली जातील, अशी कबुली प्रशासनाच्या वतीने दिल्यानंतर विद्यार्थी शांत झाले. एकीकडे विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले, तर दुसरीकडे विविध ठिकाणाहून आलेल्या स्पर्धकांनीही नियोजनावर नाराजी व्यक्त केली. विजेत्या स्पर्धकांना मेडल न मिळाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. ठाणे महापालिकेसाठी ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले. स्पर्धकांकडून ठाणे महापालिका शुल्क घेत असताना नाश्तापाण्याची व्यवस्थाही करण्यात आली नसल्याने प्रशासनाला जाब विचारण्यासाठी या स्पर्धकांनी मुख्यालय गाठले; मात्र प्रशासनाकडून कोणतेही योग्य उत्तर मिळाले नाही.

ठाकरे गटाची टीका
या प्रकारावरून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनीही महापालिका प्रशासनावर निशाणा साधला. विद्यार्थ्यांना धावण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या या स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर पदकासाठीच विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागल्याने आयोजकांच्या व्यवस्थापनावर त्यांनी टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

North Cyprus Boat Accident : समुद्रात प्रवासी बोट उलटली; २७० जण बुडाल्याची भीती, दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Officer Reshuffle: मोठा प्रशासकीय फेरबदल! ५६ बीएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अनेक जिल्ह्यांमध्ये नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती

Divorce Maintenance : कर्मचाऱ्यांना झटका ! पत्नीला पोटगी दिली नाही तर थेट पगारातून कपात; सरकारचा मोठा निर्णय

Junnar Tourism : किल्ले शिवनेरीसह जुन्नर तालुक्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी; हॉटेल व्यवसाय, रोजगाराला चालना

Eknath Shinde Parbhani : परभणीत एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा अन्... नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT