मुंबई

तीन पिढ्यांच्या सुरांनी रंगली मैफल

CD

तीन पिढ्यांच्या सुरांनी रंगली मैफल
डॉ. एन. राजम यांच्या नेतृत्वाखाली व्हायोलिनवादन; गायन-बासरी जुगलबंदीही रंगली

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : भारतीय शास्त्रीय संगीताचे चिरंतन सौंदर्य, आध्यात्मिक गहिरेपणा आणि कलात्मक समृद्धीचा अनुभव देणाऱ्या ‘अर्घ्य अर्थात इंडियन क्लासिकल म्युझिक अँड फाइन आर्ट्स फाउंडेशन’च्या संगीत मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भारतीय शास्त्रीय संगीत आणि ललित कलांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेच्या वार्षिक संगीत महोत्सवाचे हे चौथे पर्व होते. शनिवारी वांद्रे येथील गंधर्व रंगमंदिरात ही मैफल रंगली.
ज्येष्ठ व्हायोलिनवादक पद्मविभूषण डॉ. एन. राजम यांच्या नेतृत्वाखाली सादर झालेले तीन पिढ्यांचे व्हायोलिन वादन हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. डॉ. एन. राजम यांच्यासोबत नामवंत व्हायोलिनवादक संगीता शंकर, रागिणी शंकर आणि नंदिनी शंकर यांनी सादरीकरण केले. या मैफलीतून हिंदुस्थानी व्हायोलिन परंपरेतील सुरेलता, भावगर्भता आणि समृद्ध वारसा रसिकांना अनुभवता आला. तबल्यावर ओजस अधिया यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध गायिका सायली तळवळकर आणि बासरीवादक देबप्रिया चॅटर्जी यांच्या गायन-बासरी जुगलबंदीने झाली. त्यांना पखवाजवर कृष्णा साळुंके, तबल्यावर सरदार हरमीत सिंग आणि हार्मोनियमवर सुधांशू घारपुरे यांनी साथ दिली.
‘अर्घ्य-शक्तिनाद एन्सेंबल’ने गेल्या काही वर्षांत मुंबईतील भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. ज्येष्ठ आणि दिग्गज कलाकारांसोबत नवोदित व उदयोन्मुख कलाकारांना एकाच मंचावर आणत रसिक, विद्यार्थी आणि नव्या पिढीतील श्रोत्यांना शास्त्रीय संगीताशी जोडण्याचे कार्य या व्यासपीठातून केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

North Cyprus Boat Accident : समुद्रात प्रवासी बोट उलटली; २७० जण बुडाल्याची भीती, दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Officer Reshuffle: मोठा प्रशासकीय फेरबदल! ५६ बीएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अनेक जिल्ह्यांमध्ये नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती

Divorce Maintenance : कर्मचाऱ्यांना झटका ! पत्नीला पोटगी दिली नाही तर थेट पगारातून कपात; सरकारचा मोठा निर्णय

Junnar Tourism : किल्ले शिवनेरीसह जुन्नर तालुक्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी; हॉटेल व्यवसाय, रोजगाराला चालना

Eknath Shinde Parbhani : परभणीत एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा अन्... नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT